सिटी स्कॅनची मशीन देण्याच्या बहाण्याने डॉक्टरला 35 लाखाला गंडा

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – कमी किंमतीत सिटी स्कॉन मशिनची घेऊन देण्याच्या बहाण्याने कोथरूड भागातील एका डॉक्टरला 35 लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. नोव्हेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 कालावधीत हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी 34 वर्षीय डॉक्रटने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तिघांवर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉक्टरांचे कर्वे रस्त्यावर हेल्थ केअर सेंटर आहे. त्यांना सीटी स्कॉन मशीन घ्यायची होती. त्यानुसार एलेसॉनिक मेडीकल सिस्टीम्स कंपनीच्या तिघांनी डॉक्टरांचा विश्वास संपादित करुन सीटी स्कान मशीन कमी विैंमतीत मिळवून देण्याचे सांगितले. त्यासाठी 35 लाख रुपये घेउन डॉक्टरला सीटी स्वॅैन मशीन न देता फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. बी. पाटील अधिक करीत आहेत.

You might also like