डेटिंग साईटवर झालं ‘चॅटिंग’ अन् ओळखीनंतर ‘नाद’ लागला, तिनं उकळले IT इंजिनिअरकडून 37 लाख

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील एका उच्चभ्रू आयटी कंपनीत नोकरी करणार्‍या आयटी इंजिनिअरला डेटिंग साईटवर महिलेशी झालेली ओळख चांगलीच महागात पडली आहे. भारतात एकत्र व्यावसाय करणाचा बहाणा केल्यानंतर कस्टमने त्या मैत्रिणीला पकडल्याचे सांगत त्याच्याकडून तब्बल 37 लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी 32 वर्षीय आयटी इंजिनिअरने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्च ते जुलै 2019 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका नामांकित आयटी कंपनीत मोठ्या पदावर नोकरीस आहेत. दरम्यान, त्यांनी डेटिंग साईटवर खाते उघडले होते. त्यांनंतर मार्च 2019 मध्ये त्यांची एका युकेमधील महिलेशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रित झाले. त्यानंतर महिलेने त्यांना भारतात व्यावसाय करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. काही दिवसांनी महिलेने आपण दोघे मिळून एकत्र व्यावसायकरू असे सांगितले. दोघांचेही भारतात व्यावसाय करण्याचे ठरले.

काही महिन्यातच अचानक फिर्यादींना कस्टम ऑफिसमधून बोलत असल्याचा एक फोन आला. तसेच, महिला भारतात आली असून, तिच्याकडे दहा हजार र्पौड आहेत. पौंड आणि फिर्यादींना सोडविण्यासाठी कस्टम ड्युटी, बँक प्रेसिंग तसेच इतर कारणे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी 37 लाख 54 हजार 300 रुपये भरण्यास भाग पाडले. मात्र, इतके पैसे भरल्यानंतरही त्यांना पौंड किंवा फिर्यादींना सोडण्यात आले नाही. त्यावेळी त्यांना फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. त्यांनी सायबर पोलीसांकडे तक्रार दिली. या तकारीची चौकशी करण्यात आली. त्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास विमानतळ पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like