ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – एटीएम केंद्रातून पैसे काढण्यास गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याच्या बहान्याने हातचालकी करून डेबिट कार्ड बदलून त्यांच्या खात्यावरून 68 हजार रुपये काढून फसवणूक केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार नागरिक मुंबईतील सांताक्रुझ परिसरात वास्तव्यास आहेत. दोन महिन्यांपूर्वी ते एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी मदतीचा बहाणा करुन त्यांच्याकडून सांकेतिक शब्द तसेच डेबिट कार्ड घेतले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना वेगळेच डेबिट कार्ड दिले. चोरलेल्या डेबिट कार्ड तसेच सांकेतिक शब्दाचा गैरवापर करुन चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून वेळोवेळी ६८ हजार ६६५ रुपये लांबविले. अधिक तपास गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक माया देवरे करत आहेत.