वडगावशेरीमध्ये छत्रपती संभाजीमहाराजांना मानाचा मुजरा

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  –   धर्मवीर छत्रपती संभाजीमहाराजांची जयंती तुळापूर (ता.हवेली) येथे उत्साहात साजरी केली जाते. मात्र, यावर्षी कोरोना व्हायरसच्या संकटामुळे शंभूराजेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून घराघरामध्ये मानाचा मुजरा केला, असे शिवसेना शिवअंगणवाडी जिल्हा संघटिका अमृत पठारे यांनी सांगितले.

पठारे म्हणाल्या की, आम्ही दरवर्षी तुळापूर येथे जाऊन शंभूराजेंना मुजरा करून जयंती उत्साहात साजरी करतो. मात्र, यावर्षी कोरोना व्हायरसच्या संकटामुळे देशभर लॉकडाऊन असल्याने घरातच शंभूराजेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुजरा केला. याप्रसंगी

शिवसेना शाखा संघटिका ज्योती बेल्हेकर, अमृत बाहुउद्देशीय संस्थेच्या सचिव पूजा धुमाळ, मनीषा थोरात, रोहिणी टकले उपस्थित होत्या. सोशल डिस्टन्सिंग आणि तोंडाला मास्क लावून शंभूराजेंना मानाचा मुजरा केला, असे त्यांनी सांगितले.