काय सांगता ! होय, सुसंस्कृत पुण्यातही ‘चाईल्ड’ पोर्नोग्राफी, 150 व्हिडीओ ‘अपलोड’ प्रकरणी दोघे ‘ताब्यात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चाईल्ड प्रोनोग्राफी व्हिडीओ ऑनलाईन अपलोड करण्याचा विळखा पुण्यालाही पडला आहे. पुण्यातून तब्बल १२० ते १५० व्हिडिओ अपलोड झाल्याची माहिती पोलीस महासंचालक कार्यालयाने पुणे सायबर पोलिसांना दिली आहे. त्यानुसार खडक पोलीस ठाण्यात दोघाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

राजकरण पुट्टीलाल (वय २४,रा. गुरुवार पेठ) आणी मनोजकुमार झल्लार सरोज (वय १९, रा.रविवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चाईल्ड प्रोनोग्राफीला भारतासह जगातील अनेक देशांमध्ये बंदी आहे. मात्र तरीही ऑनलाईन विविध बेवसाईटवर चाईल्ड प्रोनोग्राफीचे व्हिडीओ अपलोड झाले आहेत. यासंदर्भात गुगलने काही दिवसांपुर्वीच भारतातून अपलोड करण्यात आलेल्या ३५ हजार चाईल्ड प्रोनोग्राफी व्हिडीओंची माहिती केंद्र सरकारला कळवली होती.

त्यानूसार केंद्र सरकारने संबंधित राज्यातील पोलीस महासंचालक कार्यालयांना ही माहिती पाठवली. पोलीस संचालक कार्यालयाने विविध शहरातील पोलीस आयुक्तांकडे ही माहिती दिली. दरम्यान पोलीस महासंचालक कार्यालयातून पुणे सायबर पोलिसांना पुण्यातून अपलोड झालेल्या १२० ते १५० व्हिडिओंची माहिती दिली आहे. हे व्हिडीओ ज्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरुन डाउन लोड झाले आहेत. त्याचा यूएलआर नंबरवरुन मालकाचा शोध घेतला जात आहे.

खडक पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयात मोबाईल सिमकार्ड मालक राज पुट्टीलाल याला अटक करण्यात आली. त्याने त्याच्या नात्यातील भाऊबंद मनोजकुमारला तो अल्पवयीन असताना स्वत:च्या नावाने सिमकार्ड घेऊन दिल्याची माहिती दिली. मनोजकुमारने त्याच्या मोबाईलवरुन यु ट्युबवर चाईल्ड प्रोनोग्राफीचा व्हिडीओ काही महिण्यांपुर्वी अपलोड केला होता.