Pune Chinchwad Bypoll Election | कुत्र्याची नसंबदी केल्याचा आनंद, काय अक्कल…, अजित पवारांची तुफान फटकेबाजी (व्हिडिओ)

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Chinchwad Bypoll Election | भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (BJP MLA Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक (Pune Chinchwad Bypoll Election) होत आहे. महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजप (BJP) या दोन राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. दोन्ही पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी या ठिकाणी सभा घेत आरोप प्रत्यारोप केले. राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पिंपरी चिंचवडमध्ये सभा झाली. त्यावेळी त्यांनी शिंदे सरकार (Shinde Government) आणि भाजपवर निशाणा साधताना तुफान फटकेबाजी केली. तसेच पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation (PMC) भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत भाजपवर हल्लाबोल केला.

 

 

 

काय म्हणाले अजित पवार?

पुणे महानगरपालिकेत 2017-2022 या कालावधीमध्ये जे ठेके दिले गेले, त्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांचा समावेश होता. यातून कोट्यवधी रुपये कमावण्याचं काम झालं. कोरोना काळात आम्ही नागरिकांना लस आणि ऑक्सिजन पुरवत होतो. जम्बो रुग्णालय आम्ही उभी केली. परंतु कोणी भ्रष्टाचाराचा (Corruption) आरोप केला नाही.

अक्कल कुठं पाजळली हेच कळत नाही

पुणे महापालिकेत करोना काळात अनेक घोटाळे करत त्यांनी कोट्यवधी रुपये कमावले. इंटरनेटची केबल टाकण्याच्या कामात तीनशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. जेव्हा करोना काळात रस्त्यावर कोणी फिरत नव्हत, त्यावेळी कुत्र्यांची नसबंदी केल्याचे आढळून आलं. त्यात भाजपचे नेते भागीदार होते. जेव्हा कोणी रस्त्यावर कोणी नव्हतं, तेव्हा त्यांना कुत्र्याची नसबंदी सुचत होती. यांची डोकी फिरली होती का? यांनी अक्कल कुठं पाजळली हेच कळत नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली. (Pune Chinchwad Bypoll Election)

उंटावरुन शेळ्या हाकल्या नाहीत

ज्यावेळी मी पुण्याचा पालकमंत्री होतो तेव्हा आम्ही मोठ्या प्रमाणात विकास कामे केली.
पहाटे सहा वाजता सगळे झोपेत असताना आयुक्तांना घेऊन फिरत हतो. मी नुसता उंटावरुन शेळ्या हाकल्या नाहीत.
आता बाहेरची लोकं या ठिकाणी येऊन रॅली काढत आहेत.
मुख्यमंत्र्यांनी रॅली काढावी एवढी वाईट अवस्था त्यांची झाली आहे. विशेष म्हणजे रॅली काढली कुठं?
जिथ मी आदल्या दिवशी रॅली काढली त्याच ठिकाणी त्यांनी रॅली कढल्याची टीका अजित पवार यांनी केली.

Web Title :- Pune Chinchwad Bypoll Election | ajit pawar pune speech criticized bjp on corruption during corona in pmc slam cm eknath shinde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Akshay Kumar | अखेर अक्षय कुमारने कॅनडाचे नागरिकत्व नाकारले; ‘या’ देशाच्या नागरिकत्वासाठी केला अर्ज

Nayanthara | साऊथ सुपरस्टार नयनतारा अभिनय सोडणार? लग्न- मुलांच्या जन्मानंतर तिने केला मोठा खुलासा

Prajakta Mali | ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची लेडी क्रश आहे प्राजक्ता माळी; प्राजक्ता माळीची लेसबियन पार्टनर व्हायची इच्छा केली व्यक्त