Pune Chinchwad Bypoll Election | ठरलं… राष्ट्रवादीकडून चिंचवड पोटनिवडणुकीसाठी नाना काटेंना उमेदवारी; जयंत पाटलांनी ट्विट करुन दिली माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Chinchwad Bypoll Election | चिंचवड विधानसभेचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (BJP MLA Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे याठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. भाजपने हि जागा बिनविरोध करण्याची मागणी केली होती. मात्र महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) भाजपची मागणी धुडकावून लावत निवडणूक (Chinchwad by-Election) लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्विट करुन राष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांच्या नावाची घोषणा केली आहे. (Pune Chinchwad Bypoll Election)

 

चिंचवड आणि कसबा पेठ (Kasba Bypoll) विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक आयोगाने (Election Commission) पोटनिवडणूक (Pune Chinchwad Bypoll Election) जाहीर केली आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर राष्ट्रवादीने नाना काटे (Nana Kate) यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत दिसणार आहे.

 

 

चिंचवड आणि कसबा पेठ निवडणूकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची घोषणा केली होती. मात्र महाविकास आघाडीकडून बराच काळ सस्पेन्स ठेवण्यात आला होता. महाविकास आघाडीकडून कसब्याची जगा काँग्रेसला आणि चिंचवडची जागा राष्ट्रवादीला देण्यात आली आहे. काँगेसनं (Congress) कसब्यातून रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र चिंचवडमधून राष्ट्रवादीने उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नव्हती. त्यामुळे राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर राष्ट्रवादीने नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली.

सोमवारी अजित पवारांनी पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांची पिंपरी चिंचवडमध्ये येऊन बैठक घेतली.
त्यानंतर रात्री उशिरा शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे (Rahul Kalate) हे अजित पवारांना (Ajit Pawar)
त्यांच्या घरी जाऊन भेटले. त्यानंतर जयंत पाटील राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर करतील आणि
अजित पवार या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी पोहचतील असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं होत.

 

Web Title :- Pune Chinchwad Bypoll Election | Announcement of candidate from NCP
for Chinchwad by-election, Jayant Patal tweeted the information

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा