Pune Chinchwad Bypoll Election | अश्विनी जगताप यांनी चिंचवडचा गड राखला, राष्ट्रवादीला बंडखोरीचा फटका

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Chinchwad Bypoll Election | चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप (BJP Ashwini Jagtap) यांनी राष्ट्रवादीच्या नाना काटे (NCP Nana Kate) यांचा दणदणीत पराभव केला आहे. जगताप यांनी 36 हजार 70 मतांनी नाना काटे यांचा पराभव केला. चिंचवडची पोटनिवडणूक (Pune Chinchwad Bypoll Election) तिरंगी आणि चुरशीची झाल्याने यामध्ये कोण विजयी होणार याकडे लक्ष लागले होते. या निवडणुकीत बंडखोर उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांच्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव झाल्याची चर्चा आहे.

 

चिंचवड पोटनिवडणुकीत (Pune Chinchwad Bypoll Election) तिरंगी लढत झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून अश्विनी जगताप यांनी आघाडी घेतली होती. तिरंगी लढतीचा फायदा जगताप यांना झाल्याचे दिसून आले. मतमोजणीच्या 37 व्या फेरीनंतर जगताप यांना 1 लाख 34 हजार 434 मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना 99 हजार 343 मते मिळाली. तर बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना 44 हजार 082 मते मिळाली.

 

अश्विनी जगातप यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम राहिली. दुपारी सव्वा चारच्या सुमारास त्या थेरगाव येथील मतमोजणी केंद्र जवळ पोहोचल्या. त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली. फटके फोडत कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. अंतिम निकाल ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केल्यामुळे त्यांना बॅरिकेट्स बाहेरच पोलिसांनी थांबवून ठेवले होते.

पोटनिवडणुकीच्या निकालानंतर अश्विनी जगताप म्हणाल्या, मी हा विजय सर्वसामान्य जनतेला आणि लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांना समर्पित करते.
भाजपाचे नेते, कार्य़कर्ते आणि जनता माझ्या पाठिशी उभी राहिल्यबद्दल धन्यवाद देते.
अशा प्रकारे निवडणूक लढवावी लागेल असा विचार देखील मी कधी केला नव्हता.
लोकांसाठीची लक्ष्मण जगताप यांची अपुरी राहिलेली कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title :- Pune Chinchwad Bypoll Election | bjps ashwini jagatap defeated ncps nana kate in chinchwad by election pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ravichandran Ashwin | रविचंद्रन अश्विनने मोडला कपिल देवाचा तो रेकॉर्ड; ‘हा’ कारनामा करणारा ठरला तिसरा खेळाडू

Kasba Bypoll Election Result | भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मुसंडी, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी

Uddhav Thackeray | भाजपची निती वापरा आणि फेका, पोटनिवडणुकीच्या निकालावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात (व्हिडिओ)