Pune Chinchwad Bypoll Election | सहानुभूती आणि राजकारण वेगळं, त्यामुळे आम्ही निवडणूक लढवणार; नाना काटेंची प्रतिक्रिया

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Chinchwad Bypoll Election | चिंचवड पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादीचे नेते नाना काटे (NCP Nana Kate) यांच्या नावाची मंगळवारी उमेदवारी जाहिर करण्यात आली. नाना काटे मंगळवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाना काटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सहानुभूती आणि राजकारण वेगळं आहे. त्यामुळे आम्ही ही पोटनिवडणूक लढवणार (Pune Chinchwad Bypoll Election) असल्याचे काटे म्हणाले.

नाना काटे म्हणाले, लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) हे कर्तृत्ववान आमदार होते. त्यांनी विधानसभेसाठी चांगली कामे केली आहेत. त्यांच्या निधनानंतर अजित दादा (Ajit Pawar), पवार साहेब (Sharad Pawar) आम्ही सगळे त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीला गेलो होते. सहानुभूती आम्हाला पण होती. मात्र सहानुभूती आणि राजकारण वेगळं आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक लढवणार आहोत. आज आमच्या मागणीला यश आले. आम्हाला गटबाजीची अजिबात भीती नाही. महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असणार आहे. आम्ही ही निवडणूक चांगल्या पद्धतीने लढवून विजय मिळवणार असल्याचा विश्वास नाना काटे यांनी बोलून दाखवला.

अखेर नाना काटेंच्या नावाची घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाऊसाहेब भोईर (Bhausaheb Bhoir), माजी विरोधी पक्षनेते नाना काटे,
माजी स्थायी मिती अध्यक्ष प्रशांत शितोळे (Prashant Shitole), नवनाथ जगताप (Navnath Jagtap),
मोरेश्वर भोंडवे (Moreshwar Bhondve), मयूर कलाटे (Mayur Kalate), माया बारणे (Maya Barne),
राजेंद्र जगताप (Rajendra Jagtap) हे इच्छूक होते.
या सर्वांची मनधरणी करण्याचे काम तीन दिवसांपासून सुरु होते.
तसेच या मतदार संघावर (Pune Chinchwad Bypoll Election) राष्ट्रवादी, काँग्रेस (Congress)
आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाने देखील
दावा केला होता. त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
अखेर मंगळवारी सकाळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी नाना काटे यांच्या नावाची घोषणा केली.

Web Title :- Pune Chinchwad Bypoll Election | Announcement of candidate from NCP
for Chinchwad by-election, Jayant Patal tweeted the information

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Deepa Parab Chaudhari | अंकुश चौधरीची पत्नी दीपा परबने सांगितला तिच्या आयुष्यातील ‘तो’ किस्सा; म्हणाली…

Pune Crime News | पुणे पोलिसांच्या सलग छापेमारीमुळे गुटख्याचे बडे सप्लायर ‘निजाम’, ‘मलिक’, ‘मंदार’, ‘पंकज’, ‘सुजित’, ‘सागर’, ‘गुड्डू उर्फ साकीब’, ‘निखील’ सैरभैर

Mouni Roy | ग्रे बिकिनीत अभिनेत्री मौनी रॉय दिसतेय एकदम हॉट; फोटो पाहून चाहते घायाळ