Pune Chinchwad Bypoll Election | चिंचवड पोटनिवडणूक : चिंचवडमध्ये तिरंगी लढत, पोटनिवडणूक लढवण्यावर राहुल कलाटे ठाम

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक (Pune Chinchwad Bypoll Election) तिरंगी होणार हे आता निश्चित झाले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) बंडखोर उमेदवार राहुल कलाटे (Rebel Candidate Rahul Kalate) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. कलाटेंनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी प्रयत्न केले. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील फोनवरुन त्यांच्याशी संपर्क साधला. परंतु ते निवडणूक (Pune Chinchwad Bypoll Election) लढवण्यावर ठाम आहेत. चिंचवडमध्ये माझा विजय पक्का आहे, असा विश्वास राहुल कलाटे यांनी व्यक्त केला आहे.

राहुल कलाटे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राहुल कलाटे म्हणाले, आदरणीय लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. सुरुवातीला सर्व पक्षांनी आवाहन केलं की ही निवडणूक बिनविरोध होऊ द्या. आम्ही वेट ॲन्ड वॉचच्या भूमिकेत होतो. महाविकास आघाडीने निवडणूक लढवण्याचा (Pune Chinchwad Bypoll Election) निर्णय घेतल्यानंतर मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

उद्धव ठाकरे, अजित पवार (Ajit Pawar) आणि विविध पक्षातील काही नेते ज्यांनी मला माघार घेण्याबाबत
प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भेटले त्यांच्याविषयी मी आदर व्यक्त करतो. परंतु चिंचवडच्या जनतेला ही कुस्ती कधीच
आवडली नसती. त्यामुळे जनतेतून मला प्रचंड प्रमाणात रेटा होता की, मी लढलं पाहिजे, असे राहुल कलाटे म्हणाले.

कलाटे पुढे म्हणाले, ज्या जनेतेने लक्ष्मण भाऊ असताना माझ्या पारड्यात 1 लाख 12 हजार मतांचे दान टाकलं,
त्या जनतेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी मला त्यांचे प्रश्न सोडवायला हवेत. त्यांचे प्रश्न तडीस लावण्यासाठी
मला विधानसभेत पाऊल टाकायला हवं. कार्यकर्ते आणि माझ्या साथीदारांच्या प्रचंड रेट्यामुळे मला ही निवडणूक
लढवावी लागत आहे. उद्धव ठाकरेंचा अनादर करण्याचा विषय नव्हता. पण कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर
करू शकत नव्हतो, असेही राहुल कलाटे म्हणाले.

Web Title :- Pune Chinchwad Bypoll Election | rahul kalate firm on contesting pimpri chinchwad bypoll amid call from uddhav thackeray ajit pawar