पुणे शहर भाजपचे रविवारी ‘पदवीधर मतदार नोंदणी महाअभियान’ : राजेश पांडे यांची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   भारतीय जनता पार्टीच्या वतीने येत्या रविवारी (ता. १ नोव्हेंबर) संपूर्ण शहरात ‘पदवीधर मतदार नोंदणी महाअभियान’ राबविणार असल्याची माहिती संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पश्‍चिम महाराष्ट्र नोंदणी प्रमुख राजेश पांडे आणि पुणे नोंदणी प्रमुख डॉ. श्रीपाद ढेकणे, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, सरचिटणीस दत्ता खाडे, राजेश येनपुरे, दीपक पोटे यावेळी उपस्थित होते.

पांडे म्हणाले, ‘करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने गेल्या आठ महिन्यांत व्हर्च्युअल सभा आणि बैठकांच्या माध्यमांतून कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांशी संपर्क केला. याच दरम्यान पुणे पदवीधर मतदारसंघासाठी ऑनलाइन पद्धतीने सुमारे ४० हजार पदवीधर मतदारांची नोंदणी केली आहे. या मोहिमेचा पुढील भाग म्हणजेच नोंदणीच्या अंतिम टप्प्यात ‘पदवीधर मतदार महानोंदणी अभियाना’द्वारे एकाच दिवशी २५ हजार मतदारांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.’

पांडे पुढे म्हणाले, ‘या महाअभियानाअंतर्गत बूथ स्तरावरील निवासी सोसायट्या, चाळी, वस्त्या, वाडे आदी ठिकाणी सकाळी नऊ वाजल्यापासून मतदार नोंदणी बूथ लावण्यात येणार आहेत. सामाजिक अंतर ठेवून दोन किंवा तीन कार्यकर्ते बूथवर थांबणार आहेत. प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, बूथ समिती सदस्य यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन मतदार नोंदणीचे आवाहन केले जाणार आहे.’

या अभियानाअंतर्गत अधिकाधिक नोंदणी व्हावी या उद्देशाने विविध शिक्षण संस्था, सहकारी संस्था, स्वयंसेवी संस्था, शासकीय कार्यालये, रुग्णालये, गृहनिर्माण संस्था आदींच्या पदाधिकार्‍यांशी संपर्क साधण्यात आला असून, त्या माध्यमातून मोठी मतदार नोंदणी करण्यात येणार असल्याचे पांडे यांनी पुढे सांगितले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, सर्व आमदार, महापालिकेतील पदाधिकारी, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी विविध ठिकाणच्या बूथला भेटी देणार असल्याचे पांडे यांनी सांगितले.

ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी पक्षाने bjppunepadvidhar.com  संकेतस्थळ विकसित केलेले आहे. त्यावर भेट देवून सोप्या पद्धतीने मतदार नोंदणी करणे शक्य आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही नोंदणी करता येणार आहे. ज्या मतदारांना ऑनलाईन पद्धतीने मतदार नोंदणी करताना अडथळे निर्माण होत आहेत. त्यांनी नोंदणीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे स्कॅन करून ती नजिकच्या भाजप कार्यकर्त्याकडे व्हॉटसऍपवर पाठवावीत.

२०१४ ची पदवीधर मतदारसंघाच्या मतदार याद्या निवडणूक आयोगाने रद्द केल्या आहेत. त्यामुळे सर्व पदवीधरांना नव्याने मतदार नोंदणी करणे आवश्यक झालेले आहे. जानेवारी महिन्यामध्ये निवडणूक आयोगाने २ लाख ९० हजार मतदारांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानंतरही अनेक पदवीधरांनी मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी केली. ज्या पदवीधरांनी यापूर्वीच मतदार नोंदणीसाठी प्रकि‘या पूर्ण केली आहे, त्या मतदारांना आपले नाव मतदार यादीत समाविष्ट झाले आहे किंवा नाही याची माहिती http://ceo.maharashtra.gov.in/gtsearch1/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

दोन मतदार केंद्रातील जास्तीत जास्त पाच किलोमीटर असावे

*पदवीधर मतदार नोंदणीसाठी*

*अर्जदाराची पात्रता*

*भारताचा नागरिक असावा

*पदवीधर मतदारसंघातील रहिवासी असावा

*पदवीधर मतदारसंघात पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांचा समावेश होतो

*सन २०१७ पूर्वीचा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा समकक्ष संस्थेचा पदवी किंवा पदविकाधारक असावा

*किमान ३ वर्षे कालावधीला शैक्षणिक अभ्यासक‘म पूर्ण केलेला असावा

*नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे*

*पासपोर्ट साईज फोटो

*पदवी अथवा पदविका प्रमाणपत्र किंवा शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका

*रहिवास पुरावा : आधारकार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र किंवा वाहनचालक परवाना यापैकी एक

*इतर कागदपत्रे पॅनकार्ड

*विवाहित महिलांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे

*सर्व कागदपत्रे जेपीजी किंवा जेपीईजी फार्मेटमध्ये आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करावीत

You might also like