पुण्याच्या काँग्रेसमध्ये ‘भाकरी कधी फिरणार?’; शहरात चालू झाली चर्चा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिका निवडणूक Pune Municipal Election प्रक्रिया सुरु झाल्याने पुणे शहर काँग्रेसचा Pune City Congress नवीन अध्यक्ष निवडीच्या हालचालींना वेग आला आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत संजय बालगुडे, Sanjay Balgude आबा बागुल, Aba Bagul विरेंद्र किराड, Virendra Kirad अरविंद शिंदे Arvind Shinde आणि दत्ता बहिरट Datta Bhairat असे पांच जण इच्छुक असून यात बाजी कोण मारणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. Pune city congress news

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस Maharashtra Congress पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा नाना पटोले Nana Patole यांच्याकडे आली त्याचवेळी पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष बदलले जातील हे स्पष्ट झाले. प्रदेश कार्यकारिणी नेमताना शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे यांना प्रदेशाचे उपाध्यक्षपद देण्यात आले त्याचवेळी लगेचच शहर अध्यक्षपदही बदलले जाईल असा तर्क केला जात होता.
परंतु, नाना पटोले यांनी अद्याप काहीच निर्णय घेतलेला नाही.
इच्छुकांमध्ये मात्र हालचाली वाढल्या आहेत.
त्यात विद्यमान गटनेते आबा बागुल, माजी गटनेते अरविंद शिंदे,
माजी नगरसेवक विरेंद्र किराड, माजी नगरसेवक संजय बालगुडे आणि माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी मोर्चेबांधणी केली आहे.
येत्या निवडणुकीत महापालिकेतील संख्याबळ वाढविण्याचे आव्हान काँग्रेस पक्षापुढे मोठे आहे.

Pune Accident News | दुर्दैवी ! पुण्याच्या वानवडीत विचित्र अपघातात एका महिलेचा मृत्यू

गेली पाच वर्षे काँग्रेस पक्षाची मोठ्या प्रमाणावर पिछेहाट झाली.
ती धडाडीने आणि कल्पकतेने भरुन काढणाऱ्या अध्यक्षाची पक्षाला गरज आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहराध्यक्ष बदलले.
एवढेच नव्हे तर, पक्ष आणखी ‘भाकरी फिरविणार’ असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP नेते अजित पवार Ajit Pawar यांनी दिले आहेत.
पुण्यातील काँग्रेस पक्षात ‘भाकरी कधी फिरणार’ अशी चर्चा ओघानेच चालू झाली आहे.

Web Titel : Pune city congress news

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Life insurance जर लॅप्स झाली तर ती सुरू करण्याची कोणती आहे पद्धत, जाणून घ्या येथे

Murder News | चाकूने सपासप वार करत भरबाजारातच पतीने पत्नीचा केला खून, जळगाव जिल्ह्यातील घटना