Coronavirus : ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव पाहून पुणे ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून घोषित

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : रविवारी एकाच दिवशी महाराष्ट्रात कोविड -19 चे सर्वाधिक 552 प्रकरणे समोर आले. या घटनांसह राज्यात संक्रमित लोकांची संख्या 4200 वर पोहोचली आहे. रविवारी संसर्गामुळे 12 जणांच्या मृत्यूबरोबरच राज्यात मृतांची संख्या 223 झाली असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच अधिकाऱ्यांनी सांगितले की राज्यात बरे झाल्यानंतर 507 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मोठ्या संख्येने संसर्ग होण्याबाबत विचारले असता आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की कोरोना विषाणूची लागण अद्याप वाढीच्या अवस्थेत आहे हे लोकांना समजले पाहिजे.

दुसरीकडे मुंबईनंतर पुण्यामध्ये कोविड -19 चे सर्वाधिक रुग्ण आहेत. पुण्यातील परिस्थिती बिकट होत असल्याचे पाहून पुणे महानगरपालिकेतर्फे पुण्यास आज मध्यरात्रीपासून ते 27 एप्रिल पर्यंत कंटेनमेंट झोन (Containment Zone) म्हणून घोषित केले आहे. राज्यात रविवारी मुंबईत सहा जणांचा मृत्यू झाला. मालेगाव येथे चार आणि सोलापुर, अहमदनगर मध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. एकूण 4200 प्रकरणांमध्ये मुंबईत संक्रमणाची 2724 प्रकरणे असून एकूण 132 लोकांचा मृत्यू झाला आहे.

तसेच संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत 72,023 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून त्यापैकी 67,673 प्रकरणांमध्ये संसर्ग होण्याची पुष्टी झालेली नाही. राज्यात बरे झाल्यानंतर 507 लोकांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. एकूण 87,254 लोकांना घरातच एकांतवासात राहण्यास सांगण्यात आले आहे, तर 6,743 लोकांना संस्थात्मक स्वतंत्र निवासस्थानी ठेवण्यात आले आहे.