Pune City Police HQ | पुणे पोलिस मुख्यालयातील 35 वर्षीय महिलेचा विनयभंग अन मारहाण; अश्लील बोलणार्‍या सहाय्यक फौजदार अन् 3 महिला पोलिसांवर FIR

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात (police headquarters shivaji nagar pune) सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व तीन महिला पोलीस कर्मचाऱ्यांविरूध्द महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग आणि मारहाण केल्याचा गुन्हा (molestation case) दाखल झाला आहे. यामुळे पुणे पोलिस (Pune City Police HQ) दलामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. 35-year-old woman molested and beaten at Pune Shivajinagar police headquarters; FIR against assistant sub inspector and 3 women policemen

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

याप्रकरणी एका 35 वर्षीय पोलीस महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार रत्नकांत गणपतराव इंगळे (वय 54) यांच्यासह तीन महिला कर्मचाऱ्यांवर IPC कलम 354 (ड), 193, 201, 323 341, 427, 448, 504, 506, 509 नुसार गुन्हा नोंद केला आहे. हा सर्व प्रकार जून 2020 ते जून 2021 या कालावधीत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुणे पोलीस दलात पोलीस शिपाई आहेत. त्यांचीनेमणूक शिवाजीनगर मुख्यालयात आहे. सहाय्यक उपनिरीक्षक रत्नकांत इंगळे हे मुख्यालयात लाईन डफेदार आहेत तर इतर 3 महिला पोलीस देखील मुख्यालयात कार्यरत आहेत.

दरम्यान, फिर्यादी यांच्याबाबत या तीन महिला कर्मचारी यांनी लाईन डफेदार यांच्याकडे तक्रार अर्ज केले होते. त्याबाबत त्यांनी फिर्यादी यांना फोन करून विचारपूस केली. मात्र, यावेळी त्यांनी अश्लील बोलत विनयभंग केला असे तक्रारीत म्हंटले आहे. तर फिर्यादी यांना इतर तीन महिलांनी त्यांना सार्वजनिक टॉयलेटला जातेवेळी अडविले. त्यांना जाऊ दिले नाही. त्या घरी गेल्यानंतर पुन्हा तीन महिला फिर्यादी यांच्या घरात शिरल्या व त्यांनी फिर्यादी यांचा फोन आणि इतर वस्तू आपटून फोडल्या. तर त्यांनी केलेला अर्ज मागे घ्यावा यासाठी अश्लील शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली असल्याचे म्हंटले आहे.

फिर्यादी यांनी याबाबत न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने 156/3 नुसार पोलिसांना गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिवाजीनगर पोलीस (Shivajinagar Police) करत आहेत.

Web Title :- Pune City Police HQ | 35-year-old woman molested and beaten at Pune Shivajinagar police headquarters; FIR against assistant sub inspector and 3 women policemen

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Paranjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक

पुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर ED चा ‘छापा’; 100 कोटीच्या वसुली प्रकरणाचा सुरुय तपास

2800 रुपयांचे जेवण ऑर्डर केले आणि 12 लाख रु. टिप दिली, वेटरने सांगितली ‘त्या’ मिस्ट्री मॅनची पूर्ण कथा

आदर्श ! जमशेदजी टाटा 100 वर्षात जगातील सर्वात मोठे ‘दानशूर’