पुणे पोलीस दलातील पोलीस कर्मचारी खात्यातून बडतर्फ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यास पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांनी बदतर्फीचे आदेश दिले आहेत.

संजय भिला वाघ (बक्कल न. 3738) असे खात्यातून बडतर्फ करण्यात अलेल्याचे नाव आहे.

संजय वाघ हे चतु:शृंगी पोलीस ठाण्यात कर्तव्यास होते. त्यावेळी 11 मे 2019 मध्ये त्यांना लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते. यानंतर त्यांना निलंबत करण्यात आले होते. याबाबत वाघ यांची प्राथमिक तसेच विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले होते. चौकशीत वाघ यांचे वर्तन हे पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे आहे. त्यामुळे त्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/