बकरी ईदनिमित्त पुणे शहरातील वाहतूकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सोमवारी (दि.१२) बकरी ईदच्या निमित्ताने शहरातील काही मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. ईदच्या निमित्ताने मुस्लीम बांधव ईदगाह मैदानासह सार्वजनिक ठिकाणी सामूहिक नमाज पठण करून ईद साजरी करतात. त्यामुळे ईदगाह मैदान, गोळीबार चौक या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सोमवारी सकाळी सहा ते नमाज पठण होईपर्यंत मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान चौक ते सेव्हन लव्हज चौकादरम्यान सर्व वाहनांसाठी आवश्यकतेनुसार वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी गोळीबार चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग नमाज पठणाच्यावेळी बंद राहील. तसेच सीडीओ चौक ते गोळीबार चौकाकडे येणारी वाहतूक सकाळी ७ ते १० यावेळीत पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. ढोले पाटील चौकाकडून गोळीबार मैदानाकडे तर सोलापुर रस्त्याने मम्मादेवी चौकात येणाऱ्या वाहनांना गोळीबार मैदानाकडे जाणारा मार्ग बंद असेल.

भैरोबानाला ते गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक भैरोबानाला येते बंद करून एम्प्रेस गार्डन व लुल्लानगरकडे वळविण्यात येईल. कोंढवा परिसरातून गोळीबार मैदानाकडे येणारी सर्व जड माल वाहतूक वाहने, प्रवासी वाहतूक करणारी जड वाहने, एसटी व पीएमपी बसेसला मनाई करण्यात आली आहे. या वाहनांना लुल्लानगर चौकातून भैरोबानाला चौक किंवा गंगाधाम चौकातून इच्छित ठिकाणी जाता येईल, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिले.

आरोग्यविषयक वृत्त