गुरुवारी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, होळकर पूल जलकेंद्र या ठिकाणी विद्युतविषयक विविध कामे करण्यात येणार आहेत. यामुळे येत्या गुरुवार (दि. १२) संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी (दि. १३) कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

बंद असणारे जलकेंद्र
पर्वती : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी. राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकारनगर, पद्मावती, तळजाई, बिबवेवाडी, कात्रज, धनकवडी, कोथरुड, डहाणूकर कॉलनी, हिंगणे, आनंदनगर, आंबेगाव पठार, भारती विद्यापीठ, कोंढवा. चतु:शृंगी, एसएनडीटी,
[amazon_link asins=’B07DZY45TY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bc2e3957-8431-11e8-af21-0fd26b2118ab’]
वारजे जलकेंद्र : पाषाण, औंध, खडकी, गोखलेनगर, जनवाडी, बावधन, रामबाग कॉलनी, गणेशनगर, पुणे विद्यापीठ, वारजे माळवाडी, अहिरेगाव, अतुलनगर, शाहू कॉलनी, सुतारवाडी, भूगाव रस्ता.

लष्कर व नवीन जलकेंद्र : लष्कर, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स, कोंढवा हडपसर, महंमदवाडी, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणीनगर, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, सातववाडी, विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, विश्रांतवाडी, विमाननगर.