Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या (Pune Water Supply) वारजे जलकेंद्र (Warje Water Station), खडकवासला उपसा (रॉ वॉटर) केंद्र तसेच रायझिंग मेन लाइनवर (Rising Main Line) स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी कामे करावयाचे असल्यामुळे, येत्या गुरुवारी (दि.27) कोथरुड (Kothrud), डेक्कन (Deccan), बाणेर-बालेवाडी (Baner-Balewadi) तसेच विमाननगर (Vimannagar) व लोहगाव परिसरातील (Lohgaon) पाणीपुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे. तर शुक्रवारी (दि.28) उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

या कामामुळे गुरुवारी (दि.27) वारजे जलकेंद्र येथील पंपिंग बंद ठेवावे लागणार आहे. यामुळे वारजे व पाषाण जलकेंद्र तसेच नवीन होळकर जलकेंद्र यांना होणारा पाणीपुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर (Aniruddha Pawaskar) यांनी दिली.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग

वारजे जलकेंद्र – भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, बावधन, भुगाव रोड परिसर, सूस रोड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वारजे हाय-वे परिसर, रामनगर, कर्वेरोड परिसर, एरंडवणा, कोथरुड, डेक्कन जिमखाना परिसर, जयभवानीनगर, सुतारदरा, डहाणूकर कॉलनी, परंमहंसनगर, कर्वेनगर, गांधीभवन, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड, वारजे जकातनाका परिसर

होळकर जलकेंद्र – कळस, धानोरी, विमाननगर, लोहगाव पंचायत, शिवाजीनगर, भोसलेनगर, घोलेरोड, सेनापती बापट रोड, बोपोडी, खडकी, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, रेव्हेन्यु कॉलनी, पोलीस लाईन, मुळा रोड, संगमवाडी, पाटिल इस्टेट, भांडारकर रोड.

Web Title : Pune city water supply will closed on Thursday 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Skin Care Tips-Raw Milk | जर हवा असेल क्लिअर आणि चमकदार चेहरा वापरा कच्चे दूध

Heart Patients Winter । हिवाळ्यात हृदयाच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

Mother And Son Dance Video | आई-मुलाच्या जोडीने उडवली खळबळ,
‘नाच मेरी रानी’ गाण्यावर डान्स पाहून नोरा फतेहीला देखील पडेल भुरळ

Priyanka Chopra | प्रियांका चोप्रा होणार आई, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

Pushpa Movie Mistakes | ‘पुष्पा’च्या सीनवर जिथे टाळ्या वाजल्या, तिथे झाली एवढी मोठी चूक,
अल्लू अर्जुनच्या चित्रपटात झाल्या ‘या’ 5 मोठ्या चुका

Ilena D’Cruz Oops Moment | ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केल्याने इलयाना डीक्रूझ झाली ‘Oops Moment’ची शिकार