Pune : पाण्याची टाकी साफ करताना विद्युत पंपाचा झटका बसून सफाई कामगाराचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात शाळेची पिण्याच्या पाण्याची टाकी साफ करताना विद्युत पंपाचा झटका बसून सफाई कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संचालकासह पदाधिकारी आणि कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महादेव पायाळ (वय ३८, रा. अपर, इंदिरानगर) असे मृत्यू झालेल्या सफाई कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी संचालक चंद्रकांत कुंजीर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कंत्राटदार किशोर मोरे यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीरा महादेव पायाळ (वय ३३) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव ३१ नोव्हेंबरला आंबेगाव पठार परिसरातील केब्रीज शाळेतील पाण्याची टाकी साफ करीत होते. त्यावेळी विद्युत पंपाचा झटका बसल्याने महादेव यांचा जागीच मृत्यू झाला. कोणतीही उपाययोजना न करता हलगर्जीपणा केल्यामुळे महादेवचा मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार शाळेचे संचालक चंद्रकांत कुुंजीर यांच्यासह ठेकेदार किशोर मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.