Pune : भारती विद्यापीठ व लोणी काळभोर परिसरातील बंद फ्लॅट फोडले, अडीच लाखांचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहरातील घरफोड्या काही थांबत नसून, दोन ठिकाणी बंद फ्लॅट फोडत अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भारती विद्यापीठ व लोणी काळभोर येथे या घटना घडल्या आहेत.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात रवी देवजी चव्हाण यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चव्हाण हे आंबेगाव खुर्द परिसरात राहतात. चव्हाण हे कामानिमित्त हैदराबाद येथे गेले होते. त्यांनी घराला कुलूप लावले होते. यादरम्यान चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. तसेच सोन्या-चांदीचे दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू असा एकूण 2 लाख 4 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ते परत आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

तर दुसरी घटना लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडकी आहे. मंतरवाडी येथील सोमनाथ बबन यादव यांचे बंद फ्लॅट फोडले आहे. यादव आहे कुलूप लावून आईकडे राहण्यासाठी गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच, एक टीव्ही, 25 हजाराची रोकड असा 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. दुसऱ्या दिवशी ते परत आल्यानंतर हा प्रकार समोर आला. अधिक तपास लोणी काळभोर पोलिस करत आहेत.