Pune | गणेशोत्सवासाठी मंडईतील बंद असलेले वाहनतळ सुरू करावेत – राष्ट्रवादीचे शहर चिटणीस अभिजीत बारवकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune | सार्वजनिक गणेश उत्सवामुळे मध्यवर्ती शहरात मोठ्याप्रमाणावर गर्दी होत असून पार्किंगचीही समस्या निर्माण होत आहे. यापार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने मंडई परिसरातील बंद असलेले वाहनतळ सुरू करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे चिटणीस अभिजीत बारवकर (Nationalist Congress Party Secretary Abhijeet Barwakar) यांनी अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमणार (Additional Municipal Commissioner Dr. Kunal Khemnar) यांच्याकडे (Pune News) केली आहे.

अभिजीत बारवकर यांनी यासंदर्भात आज डॉ. खेमणार यांना निवेदन दिले आहे.
त्यामध्ये सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मंडई परिसरात नागरिक व गणेश मंडळाचे कार्यकर्ते विविध साहित्य खरेदी करणेसाठी येतात. सदर ठिकाणी वाहने पार्क करणेस जागा नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून वाहनांच्या रांगा लागत आहेत. मंडई परिसरातील वाहनतळ पुणे मनपाच्या ताब्यात असून सदर वाहनतळ तातडीने चालू करणे आवश्यक आहे. कोटयावधी रूपये खर्च करून नागरिकांसाठी वाहनतळ विकसित केले असून सदर वाहनतळ विनावापर पडून ठेवणे योग्य नाही. याठिकाणी नागरिकांसाठी निविदा प्रक्रिया जरी झाली नाही तरी मनपाच्या सेवकांची नेमणूक करून सदर वाहनतळ गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने चालू करावे, अशी विनंती प्रशासनाला केली आहे.

Web Titel :- Pune | Closed parking lot in Mandai should be started for Ganeshotsav – NCP’s City Secretary Abhijeet Barwakar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Social Media | उकळत्या पाण्यात हात जोडून बसला निष्पाप बालक, 23 सेकंदाच्या Video ने लोकांना केले ‘हैराण’

ITR दाखल करताना करू नका ‘या’ 6 चूका, याच महिन्यात भरायचाय इन्कम टॅक्स रिटर्न, चूक पडू शकते महागात

Pune NCP | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जम्बो कार्यकारणी जाहिर, जाणून घ्या विधानसभा मतदार संघ निहाय अध्यक्ष अन् पदाधिकार्‍यांची नावे