Pune CNG Price Hike | पुणेकरांना महागाईचा आणखी एक झटका; सीएनजीचे दर वाढले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आधीच महागाईचा धक्का सोसत असलेल्या पुणेकरांच्या खिशावर आणखी अतिरिक्त भार पडणार आहे. (Pune CNG Price Hike) पुण्यात आजपासून सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. प्रति किलो एक रूपयांची दरवाढ झाली असून आता पुण्यात सीएनजीचा नवीन दर हा ९३ रूपये प्रति किलो एवढा असणार आहे. (Pune CNG Price Hike)

 

यापूर्वी ऑगस्ट महिन्यात सीएनजीच्या दरात वाढ झाल्याचे पहायला मिळाले होते. ऑगस्टमध्ये पुणे आणि परिसरात सीएनजीच्या दरात सहा रूपयांची वाढ करण्यात आली होती. (Pune CNG Price Hike)

 

दरम्यान, पुण्यासोबतच गुजरातमध्ये देखील आजपासून सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. गौतम अदानींच्या अदानी टोटल गॅस लिमिटेडने गुजरात येथे सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १ रूपयाची वाढ केली आहे. ही नवीन किंमत सोमवार दि.९ पासून लागू करण्यात आली आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये फेडरेशन ऑफ गुजरात पेट्रोलियम डिलर्सचे अध्यक्ष अरविंद ठक्कर यांनी यांनी गॅसची किंमत ७९.३४ रूपयांवरून ८०.३४ रूपये करण्याचे जाहीर केले.

विशेष म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वीच गुजरात गॅसने सीएनजी आणि पाईप्ड कुकिंग गॅसच्या(पीएनजी) किंमतीत ३.५ रूपयांची वाढ केली होती. गुजरातमध्ये एक किलो सीएनजी गॅसची किंमत आता ७८.५२ रूपये तर पीएनजीची किंमत ५०.४३ रूपयांवर गेली आहे.

 

अलिकडेच, अदानी टोटल गॅसला आठ शहरांमध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यास हिरवा कंदिल मिळाला होता.
त्यात मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगलोर, अहमदाबाद, चैनई, कोलकाता आणि सुरत या शहरांचा समावेश आहे.
या सर्व शहरांमध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यासोबतच कंपनी चाचणी, कमिशनिंग,
त्याचे संचालन आणि देखभालीचीही कामे करणार आहे. याबाबत अहमदाबाद येथे एक
चार्जिंग स्टेशन उभारत या क्षेत्रात अदानी उद्योग समुहाने जोरदार एन्ट्री केली आहे.

 

Web Title :- Pune CNG Price Hike | cng price increases again in pune reaches rs 93 per kg

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | सत्तासंघर्षावर अजित पवारांची प्रतिक्रिया म्हणाले, ‘न्यायव्यवस्थेला कोणी…’

Ajit Pawar | अजित पवार यांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा; म्हणाले…

Pune Pimpri Crime | मला तू कॉलेजपासून आवडते म्हणत महिलेसोबत गैरवर्तन, आरोपी गजाआड; तळेगाव दाभाडे येथील घटना