Pune CNG Price Hike | CNG दरात दोन महिन्यात तिसऱ्यांदा वाढ, जाणून घ्या आजचे दर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune CNG Price Hike | युरोपीय देशांनी (European Countries) अरब देशातून (Arab Countries) जादा दराने गॅसची खरेदी सुरु केल्याने आंतरराष्ट्रीय दरात (International Rates) वाढ (Increase) झाल्याने गेले काही दिवस सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मध्यरात्रीपासून पुण्यात सीएनजी पुन्हा 2.20 रुपयांनी महागला (Pune CNG Price Hike) आहे. आता पुण्यात सीएनजीचा दर 77.20 रुपये प्रति किलो झाला आहे.

 

युरोपीय देशांनी युक्रेनला (Ukraine) पाठिंबा दिल्याने रशियाने (Russia) युरोपीय देशांचा गॅस पुरवठा (Gas supply) अचानक बंद केला आहे. त्यामुळे या युरोपीय देशांनी अरब देशांकडून 40 डॉलर प्रति सिलिंडर या दराने गॅस खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. या आधी हाच दर 20 डॉलर प्रति सिलिंडर होता. पेट्रोल (Petrol), डिझेलऐवजी (Diesel) वाहने सीएनजीचा अधिक वापर करु लागली आहेत. त्याचबरोबर गॅसचा औद्योगिक वापरही वाढत आहे. त्यामुळे भारतात नैसर्गिक गॅसच्या (Natural Gas) मागणीत सातत्याने वाढ होत आहे. (Pune CNG Price Hike)

 

मागील आठवड्यात 19 एप्रिल रोजी २ रुपयांनी सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली होती. या दरवाढीचा परिणाम शहरातील (Pune CNG Price) सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. पीएमपी (PMP), रिक्षा या प्रामुख्याने सीएनजीवर चालतात. सीएनजीच्या दरात सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे रिक्षाचालक व पीएमपीचे सर्व गणित कोलमडले आहे.

भारत (India) अनेक वर्षे कतार (Qatar), मस्कत (Muscat) व इतर अरब देशांकडून गॅस खरेदी करत आहे.
मात्र, आता दर दुप्पट झाल्याने सीएनजीची दरवाढ होत आहे.
रशिया – युक्रेन युद्ध (Russia – Ukraine war) जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत ही दरवाढ होत राहण्याची शक्यता आहे.
येत्या काही दिवसात सीएनजीचे दर 80 रुपये किलोवर जाण्याची शक्यता आहे,
असे ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे (All India Petrol Dealers Association) प्रवक्ता अली दारुवाला (Spokesman Ali Daruwala) यांनी सांगितले.

 

Web Title :- Pune CNG Price Hike | CNG prices rise for third time in two months find out todays rates

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा