Pune CNG Pump | पुणेकरांचे टेन्शन वाढवणारी बातमी! आज पासून पुणे ग्रामीण भागातील CNG पंप अनिश्चित काळापर्यंत बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सुधारित व्यापार मार्जिन (Trading Margin) मिळेपर्यंत पुण्यातील ग्रामीण भागात (Pune Rural) असणारे सीएनजीचे पंप (Pune CNG Pump) अनिश्चित काळापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पेट्रोल डीलर्स असोसिएशनने (Petrol Dealers Association) घेतला आहे. एमओपीएनजी (MOPNG) पत्रकानुसार, व्यापार मार्जिन सुधारित मिळत नाही तोपर्यंत आजपासून (1 नोव्हेंबर) अनिश्चित काळासाठी पुणे ग्रामीण भागातील टोरेंट सीएनजी पंपावरुन सीएनजीची विक्री न (Pune CNG Pump) करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.

आजपासून पुण्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या सीएनजी पंपावर गॅस मिळणार नाही. सर्व सीएनजी पंप बंद राहणार आहेत. पुण्यातील सीएनजी पंप (Pune CNG Pump) चालकांनी हा निर्णय घेतला असून यामुळे सर्वसामान्य पुणेकरांच्या दिनचर्येवर याचा परिणाम होणार आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहे. परंतु आज पासून सीएनजी पंप अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहेत. पेट्रोल डीलर्स असोसिएशनने हा निर्णय घेतला असून सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत.

जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत संप सुरुच राहणार असल्याचा इशारा पेट्रोल डीलर्स असोसिएशननं दिला आहे.
ड्यू पेमेंट (Due Payment) आणि व्याजाची रक्कम (Interest Amount) डीलर्सच्या खात्यात पोहोचेपर्यंत
सीएनजी पंप बंद राहणार असल्याचे पेट्रोल डीलर्स असोसिएशननं स्पष्ट केलं आहे.
त्यामुळे आजपासून पुणेकरांना सीएनजी गॅस मिळणार नाही. आजपासून सीएनजीची विक्री अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहे.

Web Title :- Pune CNG Pump | cng will not available in pune from 1st november as cng sale will be stopped due to unlimited strike until demands get fulfilled

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalgaon ACB Trap | क्राईम मिटींगला येण्याच्या तयारीत असलेले 2 पोलिस अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, संपुर्ण जिल्ह्यात खळबळ

IND vs BAN | बांग्लादेशविरुद्धचा सामना भारतासाठी महत्त्वाचा, पाऊसाचा व्यत्यय येणार का?

Sushma Andhare | शिंदे गटातील आमदाराचा सुषमा अंधारे टोला, म्हणाले -‘…अंधारात सुद्धा दिसत नव्हत्या’