Pune Coep Jumbo Covid Centre | सीओईपी जम्बो कोरोना स्पेशालिटी हॉस्पीटल सुरू करण्याच्या तयारीत पण…महापालिकेने जुनीच बिले न दिल्याने संस्थां काम करणार का याबाबत साशंकता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Coep Jumbo Covid Centre | कोरोनाचे संकट कायम असल्याने पुणे महापालिकेने (Pune Corporation) उपचारांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून शिवाजीनगर (Shivaji Nagar) येथील सीओईपी मैदानावरील जंबो हॉस्पीटल (Coep Jumbo Covid Hospital) पुन्हा चालू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. परंतू या हॉस्पीटलमध्ये उपचार, औषधे, सुरक्षा, स्वच्छता व संपुर्ण व्यवस्थापन पाहाणार्‍या संस्थेचे सुमारे ५ कोटी रुपयांचे बिल मागील ९ महिन्यांपासून थकविल्याने गरजेच्यावेळी हे हॉस्पीटल सुरू होणार? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. (Pune Coep Jumbo Covid Centre)

 

मार्च २०२० मध्ये शहरात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. पहिल्या लाटेतच रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढल्याने राज्य शासनाने PMRDA च्या माध्यमातून आणि महापालिकेच्या सहकार्याने त्याचवर्षी ऑगस्ट अखेर सीओईपीच्या मैदानावर ८०० बेडस्चे जंबो हॉस्पीटल सुरू केले. पहिल्या व दुसर्‍या लाटेमध्ये गंभीर रुग्णांसह ऑक्सीजनची गरज भासलेल्या कोरोना बाधितांना जंबो हॉस्पीटलचा उपयोग झाला. जंबो हॉस्पीटलच्या उभारणीपासून उपचार व सुरक्षा व्यवस्थेचे काम हे खाजगी संस्थांना दिले होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही याच खाजगी संस्थेवरच दिली होती. (Pune Coep Jumbo Covid Centre)

दुसर्‍या पहिल्या व दुसर्‍या लाटेच्यावेळी या हॉस्पीटलच्या बहुतांश खर्चाची जबाबदारी महापालिकेकडेच राहीली असून अद्यापही महापालिकाच हा खर्च उचलत आहे.
मागीलवर्षी दुसरी लाट ओसरल्यानंतर जून- जुलैपासून हे हॉस्पीटल तात्पुरते बंद ठेवण्यात आले.
संभाव्य तिसर्‍या लाटेचा विचार करून हॉस्पीटलची उभारणी करणार्‍या संस्थेला मुदतवाढ देण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून कोरोनाची तिसरी लाट सुरू असून रुग्णसंख्या २२ हजारांच्या पुढे पोहोचली आहे.
सुदैवाने बहुतांश रुग्णांना सौम्य लक्षणे असल्याने रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे.

 

दरम्यान, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेउन महापालिकेने जंबो रुग्णालय सुरू करण्यासाठी साफ सफाई, बेडस् व ऑक्सीजनची अरेंजमेंट केली आहे.
मात्र, हे हॉस्पीटल चालविण्याची जबाबदारी ज्या संस्थेकडे होती, त्यांचे सुमारे पाच कोटी रुपयांचे बिलच अद्याप केलेले नसल्याने वेळ पडल्यास ती संस्था हॉस्पीटल सुरू करणार का ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
हे हॉस्पीटल सुरू केल्यानंतर मधल्या टप्प्यात डॉक्टर, सफाई कर्मचारी व अन्य स्टाफचे वेतन अनेकदा रखडले होते.
त्यामुळे अनेकांनी सेवा बंद केली होती. तसेच थकित वेतन मिळावे यासाठी कर्मचार्‍यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर आंदोलनही केले होते.
आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णसेवा देण्यात कुठलिही कसर न ठेवलेल्या संस्था व कर्मचार्‍यांना वेतन देण्यास महापालिकेमुळे विलंब झाला ही वस्तुस्थिती आहे.
या गोष्टीला आठ- नऊ महिने उलटल्यानंतरही महापालिकेकडून अद्याप पाच कोटी रुपयांहुन अधिकचे बिल अद्याप दिलेच गेले नसल्याने संबधित संस्था व संस्थेच्या कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
यामुळेच अचानक गरज भासल्यास जंबो हॉस्पीटल सुरू होईल ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

जंबो हॉस्पीटल सुरू करताना येथील डॉक्टर व अन्य स्टाफसाठी परिसरातील हॉटेल व लॉजमधील खोल्या बुक करण्यात आल्या होत्या.
पहिल्यांदा नेमलेल्या लाईफ लाईन कंपनीची सेवा अवघ्या दहा ते बारा दिवसांत बंद करण्यात आली.
या संस्थेच्या डॉक्टर्स व स्टाफसाठी ज्या हॉटेल व्यावसायीकांनी त्यांच्या खोल्या उपलब्ध करून दिल्या होत्या, त्यांचे दहा दिवसांचे रुम चार्जेस अद्याप दिलेले नाहीत.
आपत्कालीन परिस्थितीत महापालिका आणि पीएमआरडीएच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या आश्‍वासनांवर व्यावसायीकांनी कडक लॉकडाउन असतानाही तातडीने रुमसह जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली.
मात्र, परिस्थिती निवळल्यानंतर केवळ कागदीघोडे नाचवत आणि एकमेकांकडे बोट दाखवणार्‍या पुणे महापालिका आणि PMRDA ने या व्यावसायीकांची देखिल बिले अदा केलेली नाहीत, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

 

Web Title :-  Pune Coep Jumbo Covid Center | COEP is preparing to start Jumbo Corona Specialty Hospital but Doubts about whether the institutions will work as the Pune corporation has not paid the old bills

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे दुसऱ्यांदा ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, मनपा आयुक्त विक्रम कुमारांसोबत केला होता पाहणी दौरा

 

Where To Invest | तरुण गुंतवणूकदारांची सर्वात मोठी समस्या: पैसे तर वाचवले, पण गुंतवणूक कुठे करावी ?