पुणे : प्रेम प्रकरणातून कंपनीतील कामगराचा खून

कोरेगाव भीमा : पोलीसनामा ऑनलाईन

एका कंपनीमध्ये काम करणाऱ्या सुपरवायझरने प्रेम प्रकरणातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन कामगाराला चाकूने भोकसत त्याचा खून केल्याची घटना सणसवाडीमध्ये उघडकीस आली. ही घटना आज (सोमवार) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B075FY4RWK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e6c3ab6a-a497-11e8-a72c-61435657637b’]

दामोदर कृष्णा जबल (रा. सणसवाडी ता. शिरूर मूळ रा. धारावी, मुंबई )असे खून करण्यात आलेल्या कामगाराचे नाव आहे. सुपरवायझर संतोष शहाजी राठोड (रा. येडशी ता. उस्मानाबाद) याच्याविरुद्ध खूनाचागुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अमित अभिमन्यू जाधव (रा. सणसवाडी ता. शिरूर ) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीत काम करणारा कामगार जबल व सुपरवायझर राठोड यांच्यात दोन दिवसापूर्वी एका मुलीच्या प्रेमप्रकरणातून भांडणे झाली होती. त्यांनंतर त्यांच्या लेबर कॉनट्रॅक्टचे मालक अमित जाधव यांनी दोघांना समजावून सांगत दोघांनाही भेटायला बोलावले होते. मात्र, सोमवारी सकाळी कंपनी सुपरवायझर संतोष राठोड याने रागाच्या भरात सणसवाडी येथील संचेती कंपनीजवळ कामगार जबल याला चाकूने भोकसून खून करत पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी कामगाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु ,उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला.
[amazon_link asins=’B07417987C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f4688ee8-a497-11e8-96b6-7f1ea2aa17d3′]

पोलिसांनी फरार आरोपी संतोष राठोड याचा शोध घेण्यासाठी दोन स्वतंत्र पथके रवाना केली आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर हे करत आहे.