कंपनी मॅनेजरने केली चरसची तस्करी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे अनेक उद्योगधंदे ठप्प झाले, या संकटात अनेकांना नोकरीही गमवावी लागली. त्याशिवाय उद्योगपतींचे मोठे नुकसान झाले. कोरोनामुळे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी पुण्यातील एका विमा कंपनीतील मॅनेजर चरसची तस्करी केली. त्याला पोलिसांनी अटक केले आहे. अर्पित गुप्ता असे त्याचे नाव आहे.

विमा कंपनीत काम करत असलेल्या अर्पितने काही महिन्यांपूर्वी कर्ज घेऊन रेस्टॉरंट सुरू केले होते. मात्र, लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे रेस्टॉरंट बंद झाले, परिणामी कर्जाचे हफ्ते चुकवण्यासाठी अर्पितकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्याने चक्क चरसची तस्करी करण्यात सुरुवात केली. राजेंद्रनगर पोलिसांनी अर्पितला 2 लाख रुपये आणि 860 ग्रॅम चरससह रंगेहात पकडले. अर्पित मुळचा कानपूरचा असून पुण्यात गेली काही वर्ष तो काम करत होता. लॉकडाऊनआधी त्याने पुण्यात रेस्टॉरंट उघडले होते. यासाठी त्याने गोल्ड लोन आणि कर्जही घेतले होते. मात्र कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे अर्पितने चरस विकण्यास सुरुवात केली. त्याने कानपूरमध्ये राहणार्‍या मित्राकडून चरस मागवले होते. अर्पितचा हा मित्र नेपाळमधून चरस मागवत होता. चरसची तस्करी करून जास्त पैसे मिळत असल्यामुळे अर्पितने हे काम सुरू केले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like