Pune | खासगी बसच्या धडकेत मृत्यू झालेल्याच्या कुटुंबियांना 1 कोटी 9 लाखांची नुकसान भरपाई; लोकअदालतीत दावा निकाली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्याच्या शिवाजीनगर (Pune) कोर्टाने अतिशय महत्वाचा निर्णय दिला आहे. रस्ता ओलांडताना बसच्या धडकेने मृत्युमुखी पडलेल्या एका पादचाऱ्याच्या कुटुंबीयांना एक कोटी नऊ लाख रुपये नुकसान भरपाई (compensation) देण्याचे आदेश पुण्याच्या शिवाजीनगर (Shivajinagar Court, Pune) कोर्टाकडून देण्यात आले आहेत. सुधीरकुमार बुक्के (Sudhir Kumar Bukke) आणि ॲड. सुरेंद्र दातार (Adv. Surendra Datar) यांच्या पॅनेलने न्यायालयात पार पडलेल्या लोकअदालतीत हा दावा निकाली काढला.

 

या अपघातात मृत्युमुखी पडलेली व्यक्ती पुण्यातील खडकीतील (Pune) आर्मी बेस वर्कशाॅपमध्ये तांत्रिक होते. १ सप्टेंबर २०२१ रोजी मोशीतील सरदार चौकातून ते निघाले होते. रस्ता ओलांडत असताना त्यांना बसने धडक दिली होती. गंभीर जखमी झालेल्या पादचारी व्यक्तीस तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु रुग्णालयाने त्यांना मृत घोषित केले. मृत व्यक्तीचे वय ४८ वर्षे होते. त्यांना दरमहा ८० हजार रुपये वेतन मिळत होते. अपघातात मृत्युमुखी पडल्याबद्दल नुकसान भरपाई मिळावी म्हणून त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांने ॲड. अनिल पटणी (Adv. Anil Patni) आणि ॲड. आशिष पटणी (Adv. Ashish Patni) यांच्या मदतीने मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला.

तडजोडीसाठी अर्जदाराचे वकील ॲड. अनिल पटणी आणि ॲड. आशिष पटणी, गो डिजिट जनरल इन्शुरसन्सचे (Go Digit General Insurance) अधिकारी सुखप्रीत सिंग (Sukhpreet Singh) आणि ॲड. सुनील द्रवीड (Adv. Sunil Dravid) यांनी महत्वाची भूमिका बजावली.
बसमालक आणि विमा कंपनी असलेल्या गो डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात सत्र न्यायाधीश आणि
मोटार अपघात न्याय – प्राधिकरणाचे सदस्य डी.पी.रागीट यांच्या न्यायालयात हा दावा दाखल झाला होता.
दावा दाखल केल्यापासून एका वर्षात निकाली काढण्यात आलेला आहे.

 

Web Title :- Pune | compensation one crore nine lakhs to families those killed collision private bus pune print news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sushma Andhare | योग्य वेळी राजकीय मंचावरुन मी उत्तर देईल…” विभक्त पतीच्या वक्तव्यावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

Sanjay Raut | संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका; म्हणाले – ‘फुटिरांच्या गटात एक शिंदे कायम …’

Eng vs Pak Final | पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमच्या नावावर लाजीरवाणा विक्रम, जाणून घ्या काय आहे तो विक्रम?