Pune : स्पर्धेमुळे मुलांमधील आत्मविश्वास वाढतो – सहसंचालक डॉ. दत्तात्रेय जाधव

पुणे : कोरोनाचे वातावरण असतानासुद्धा, विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी पीव्हीपीआयटी संस्थेने घेतलेली स्पर्धा निश्चित कौतुकास्पद आहे. तंत्र संचालयाकडून विध्यार्थीभिमुख ज्या ज्या विविध योजना राबवल्या जातात, याविषयी त्यांनी माहिती दिली. अशा प्रकारच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, असे तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयातील सहसंचालक डॉ. दत्तात्रेय जाधव यांनी सांगितले.

दी शेतकरी शिक्षण मंडळ संचालित, पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी बावधन येथे महाराष्ट्रातील तंत्रनिकेतेनच्या विद्यार्थ्यांकरिता प्रोजेक्ट, पोस्टर आणि आयडिया स्पर्धेचे ऑनलाईन पद्धतीने दोन दिवस (दि. ७ आणि ८ मे) आयोजन केले होते. दोन दिवसीय राज्यस्तरीय स्पर्धा संस्थेच्या, अणुविद्युत व दूरसंचार विभागाद्वारे घेण्यात आली. राज्याच्या गडचिरोली, मुंबई, नंदुरबार, सावंतवाडी आदी शहरी, निम-शहरी आणि ग्रामीण भागातील तंत्रनिकेतनच्या ५५० विदयार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला.

विभागप्रमुख डॉ. धीरज ढाणे यांनी स्पर्धेचे नियम व अटी, तथा एकाचवेळी चार वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या स्पर्धेची माहिती दिली. प्राचार्य डॉ. सी. एम. सेदानी यांनी संस्थेची व कोरोना काळात, संस्थेने राबविलेल्या समाजपयोगी उपक्रमाची माहिती दिली.

दोन दिवसीय स्पर्धेतील 12 गटांना पारितोषिके जाहीर केली. दरम्यान, डॉ. बिप्लब सरकार, प्रा. सचिन पाटील आणि प्रा. अवधूत कडू, यांनी विभागांची माहिती दिली. स्पर्धेत सहभागी झालेल्यांना इ-प्रमाणपत्र देण्यात आले.

यंत्र अभियांत्रिकी गटामध्ये लोणी येथील डॉ. विखे पाटील तंत्रनिकेतन विभागातील प्रथम आलेल्या राहुल कुसूमकर हा ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी विद्यार्थ्यांबरोबरच्या स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम येऊ शकलो. संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी दिली, त्यामुळे या स्पर्धेत पहिला आलो, असे सांगताना तो भारावून गेला होता.

संस्थेचे सचिव गिरीराज सांवत, संकूल संचालक डॉ. वसंत बुगडे, प्राचार्य डॉ. सी. एम. सेदानी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. अपर्णा बडवे, प्रा. डॉ. श्यामसुंदर कुलकर्णी, प्रा. शिल्पा धानोरकर आणि प्रा. शेखर बोडके, प्रा. सारिका बोडके, प्रा. स्नेहल झवेरी, प्रा. सागर अंबुरे, प्रा. चेतन चौधरी, सर्व शाखाचे विभागप्रमुख स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.प्रा. प्रा. स्वाती गांधी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. धिरज ढाणे यांनी आभार मानले.