Pune Congress News | काँग्रेसने केले आशानगर पाण्याच्या टाकीचे उदघाटन; लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपच्या अंगलट – माजी नगरसेवक दत्ता बहिरट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Congress News | काँग्रेस आणि महापालिकेच्या Pune Municipal Congress (PMC) प्रभाग क्रमांक ११ येथील आशा नगर येथील माता रमाई बाबासाहेब आंबेडकर जलकुंभाचे उदघाटन काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज (गुरुवारी) प्रजासत्ताक दिनी करण्यात आले. (Pune Congress News )

याप्रसंगी माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Congress Mohan Joshi), आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar), माजी मंत्री रमेश बागवे, दीप्ती चवधरी, संजय बालगुडे, अभय छाजेड, विरेंद्र किराड, अविनाश बागवे, शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे, उदय महाले, राहुल शिरसाट आदी नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. स्थानिक रहिवाशांच्या प्रतिसादाने कार्यक्रम उत्साहात पार पडला.

काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या सहकार्याने पाण्याच्या टाकीची उभारणी मी करू शकलो. भारतीय जनता पक्षाचे आमदार यांचा कामाचा श्रेय घेण्याचा प्रकार त्यांच्या अंगलट आला. रहिवाशांनी त्यांना दाद दिली नाही. यापुढे विकास कामात काँग्रेस आघाडीवर राहील, असे यावेळी बोलताना माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी सांगितले.

पाण्याच्या टाकीसाठी बहिरट यांनी प्रयत्न केले हे सर्वाँना माहीत आहे. काँग्रेसच्या कामाचे श्रेय घेण्याचा खटाटोप भाजप करीत आले आहे. पण लोकांकडून त्यांना प्रतिसाद मिळेनासा झाला आहे, असे मोहन जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

टाकीसाठी विना मोबदला जागा बहिरट यांनी मिळवून दिली. लोकांचा त्यांच्यावर विश्वास असल्याने हे घडले, असे आमदार धंगेकर यांनी सांगितले.

महापालिकेच्या मुख्य सभेने टाकीचे उदघाटन कसे करावे? हे ठरवून दिले होते, परंतु, भाजपच्या आमदारांनी टाकीसाठी
काहीही न करता उदघाटनाचा घाट घातला आहे, हे सर्व जनता ओळखून आहे.
शिवाजीनगर मतदारसंघातील जनतेला दत्ता बहिरट यांच्या कामाची चांगली माहिती आहे.
जनता बहिरट यांच्यावर विश्वास ठेवेल, असे बागवे यांनी सांगितले.

या कार्यक्रमात ॲड.शाबीर खान, विनोद रणपिसे, उदय वाघ, प्रविण डोंगरे, आशुतोष जाधव, अजित जाधव, राजेंद्र भुतडा,
रमेश पवळे, चेतन अगरवाल, सुरेश कांबळे, राजश्री ताई अडसूळ, संगीता ताई रूपटक्के, राजन नायर, भरत ठाकूर,
कुणाल काळे, प्रसाद वाघमारे, स्वप्नील नाईक, साहिल राऊत, प्रथमेश लभडे, वाल्मिकी जगताप, जावेद नीलगर,
विनोद बांदल, सनी यादव आदी महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Deepak Kesarkar | जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा निघाला?, मंत्री केसरकरांनी केले मोठे वक्तव्य

Pune Pimpri Chinchwad Crime News | मंदिरात दान करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला लुटले, धायरी येथील प्रकार

पुणे शहरात चोरट्यांचा सुळसुळाट, घरफोडीच्या तीन घटनांमध्ये हिरेजडीत दागिन्यासह रोकड लंपास

जामिनदाराची बनावट सही करुन दोघांची फसवणूक, पतसंस्थेच्या अध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव यांच्यावर FIR; सदाशिव पेठेतील प्रकार