Pune Congress News | आशानगर पाण्याच्या टाकीचे उदघाटन कॉंग्रेस करणार; श्रेय उपटण्याची भाजपची संतापजनक धडपड – माजी नगरसेवक दत्ता बहिरट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Congress News | महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ११ येथील आशा नगर पाण्याच्या टाकीची उभारणी काँग्रेसच्या आणि माझ्या प्रयत्नातून झाली असून प्रजासत्ताक दिनी उदघाटन कॉंग्रेस कार्यकर्ते करतील, असे माजी नगरसेवक दत्ता बहिरट (Datta Bahirat) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

या पत्रकार परिषदेला माजी आमदार, प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Congress Mohan Joshi) आणि आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) उपस्थित होते.आशानगर आणि परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटावा याकरिता दत्ताजी बहिरट यांनी सन २०१रपासून अथक प्रयत्न केले. वीस लाख लिटर्स क्षमतेची टाकी झाली आणि आता भाजपचे स्थानिक आमदार आयत्या बिळावर रेघोट्या मारत पालकमंत्र्यांच्या हस्ते २६ तारखेला उदघाटन करीत आहेत, हा प्रकार निषेधार्ह आहे, असे मोहन जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

नगरसेवक या नात्याने दि. २० एप्रिल २०१२ रोजी आशानगर टाकीचे काम सुचविले.
टाकीसाठी आशा नगर हौसिंग सोसायटी यांच्याशी संवाद साधून विनामोबदला जागा मिळवून दिली. नंतर सातत्याने पाठपुरावा केला, सर्व प्रकारच्या मंजुरी मिळविल्या. माता रमाई बाबासाहेब आंबेडकर जलकुंभ असे नाव निश्चित केले,अशी माहिती बहिरट यांनी दिली.भाजपचे स्थानिक आमदार केवळ श्रेय उपटू पहात आहेत, असा आरोप बहिरट यांनी केला.

टाकी उभारणी कामाचे श्रेय बहिरट यांचे मान्य करावे, त्यांना डावलू नये अशी विनंती पालकमंत्री अजित पवार यांना
केली आहे. या उपरही टाकी उदघाटन कार्यक्रम होणार असेल तर कॉंग्रेस कार्यकर्ते दि. २६ रोजी सकाळी ११ वाजता करतील,
असे आमदार रवि धंगेकर यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

भरलेल्या गॅस सिलेंडर मधील गॅस चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Police MPDA Action | जनता वसाहत मधील अट्टल गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध, पोलीस आयुक्तांची 96 वी कारवाई

देहूरोड येथे साडे 11 लाखांचा गुटख्याचा साठा जप्त, एकाला अटक