Pune Congress News | पुणे शहर काँग्रेस पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर, बागुलांच्याविरोधात बॅनरबाजी (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Congress News | पुणे लोकसभा मतदारसंघासाठी (Pune Lok Sabha) महायुतीकडून (Mahayuti) मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), वंचितचे (Vanchit Bahujan Aghadi) वसंत मोरे (Vasant More) आणि एमआयएमचा (MIM) उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पहिल्या दिवसापासून काँगे्रस अंतर्गत वादाला तोंड द्यावे लागत आहे. उमेदवारी न मिळालेले आबा बागुल (Aba Bagul) यांनी थेट देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती, आता बागुलांच्या विरोधात पुण्यात काँग्रेस कार्यकत्र्यांनी बॅनर झळकवला आहे.

पुणे लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज काँग्रेस नेते आबा बागूल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरला जाऊन भेट घेतली होती. या घटनेनंतर बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी बागुलांची भेट घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता.(Pune Congress News)

याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, नाराजांकडे जाणे, त्यांच्याशी बोलणे हे आमचे काम आहे. बागूल यांचीही नाराजी दूर होईल अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, बाळासाहेब थोरात हे पत्रकार परिषदेत बोलल्यानंतर आबा बागुल यांच्या हकालपट्टीची मागणी करत काँग्रेसचे
दोन पदाधिकारी काँग्रेसभवनमध्ये बॅनर्स घेऊन आले. त्यांनी काँग्रेस भवनाबाहेर हे बॅनर्स झळकवले.

या बॅनरवर, नागपूर येथे भाजप नेत्यांची भेट घेऊन येणाऱ्यांचा जाहीर निषेध, गद्दार भगाओ, काँग्रेस बचाओ,
आपला – मुकेश मधुकरराव धिवार, प्रदेशाध्यक्ष – राहुल प्रियंका गांधी सेना, महा. राज्य, असा मजकूर लिहिलेला आहे.

दरम्यान, रवींद्र धंगेकर यांना पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाल्यापासून काँग्रेसमधील वाद
वाढत चालला आहे. यामुळे धंगेकर यांना निवडणुकीच्या रिंगणातील लढाईसह पक्षांतर्गत वादाकडे देखील लक्ष द्यावे
लागत आहे. यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : प्रेमसंबंधातून महिलेचा खून, आरोपीला काही तासात गुन्हे शाखेकडून अटक (Video)

Health Insurance | मोठा निर्णय! आता हेल्थ इन्श्युरन्ससाठी नाही वयाचे बंधन, आजारी व्यक्तीही घेऊ शकतात विमा, 65 वर्षांची वयोमर्यादा हटवली