Pune Congress On Manipur Govt | पुणे: मणीपुर सरकार त्वरित बरखास्त करा – काँग्रेस नेते मोहन जोशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Congress On Manipur Govt | गेले तीन महिने मणिपूर राज्यात हिंसाचाराचा जो उद्रेक चालु आहे तसेच अनेक महिलानवर अत्याचार चालु आहे, या अत्याचारा विरोधात रिजनल ख्रिश्चन सोसायटी व पुरोगामी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर (Pune Collector Office) मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. (Pune Congress On Manipur Govt)

या प्रसंगी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Congress Leader Mohan Joshi) गेले तीन महिने जो जातीयवादी हिंसाचाराचा चालु आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना या विषयाचे गांभीर्य अजिबात नाही कॉंग्रेस पक्षाने अनेकदा त्यांना विनंती करुन सुध्दा ते या गोष्टींवर मुगगिळुन गप बसले आहे, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मणिपूर दौरा करून तेथील जनतेच्या भावना जाणून घेण्याल्या त्यांच्या बद्दल संवेदना व्यक्त केल्या व त्यांना धीर देला.काल सोशल मीडियावर जे फोटो वायरल झाले त्यात दोन महिलांनावर जे अत्याचार करण्यात आले ते संपूर्ण जगाने पाहिले त्या मुळे आपल्या देशाची मान शर्मेने खाली गेली आहे,

काल मा. सुप्रीम कोर्टाने या घटनेची दखल घेतली व केंद्र सरकार वर ताशेरे ओढले, त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या बाहेर आठ मिनिटाच्या भाषणात फक्त 36 सेकंदच या विषयावर बोलले आमची एकच मागणी आहे मनिपुर सरकार बरखास्त झाले पाहिजे व राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे. (Pune Congress On Manipur Govt)

पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांना संघटनेच्या वतीने निवेदना देण्यात आले.
या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत केदारी, राहुल डंबाळे अश्विनीताई लांडगे,
प्रविण करपे,जुबेर मेमन,सुरेश कांबळे,पाष्टर केळकर,
फादर रॉबीन मानतोडे, अन्टॉन कदम, अलीस लोबो,
याच बरोबर समाजतील पुरोगामी विचारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या प्रसंगी मणिपूर अत्याचार धिंकार करण्यात आला,
मणिपूर वाचवा मानवता वाचवा, बरखास्त करा बरखास्त करा मणीपुर सरकार बरखास्त करा या घोषणा देण्यात आल्या..

Bombay High Court On Sudhakar Jadhavar | प्राचार्यपदी मुदतवाढ मागणाऱ्या
सुधाकर जाधवर यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, जाणून घ्या प्रकरण

Alia Bhatt | आलियाला वाटत नाही तिची मुलगी व्हावी अभिनेत्री; राहा भविष्यात होणार…