Pune Congress Protest Against BJP Govt | काँग्रेसचे भाजपाच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध तीव्र आंदोलन ! ‘भाजप’ वॉशिंग मशीन, ‘मोदी’ वाशिंग पावडर

पुणे :पोलीसनामा ऑनलाइन – Pune Congress Protest Against BJP Govt | पुणे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर (Pune BJP Officer) काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुमारे अडीच तास तीव्र अभिनव असे भाजपा वॉशिंग मशीन, मोदी वॉशिंग पावडरच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा भ्रष्टाचारी चेहरा उघड करण्यात आला. (Pune Congress Protest Against BJP Govt)

प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi), आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar), माजी राज्यमंत्री रमेश बागवे (Ramesh Bagwe), गोपाळ तिवारी (Gopal Tiwari), पूजा आनंद (Pooja Manish Anand) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनाच्या ठिकाणी प्रत्यक्ष वॉशिंग मशीन ठेवून त्यावर भाजपा वॉशिंग मशीन असे लिहिले होते. तसेच सोबत मोदी वॉशिंग पावडरही ठेवण्यात आली होती. (Pune Congress Protest Against BJP Govt)

याप्रसंगी विविध घोषणांचे फलक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते – ‘इडी, सीबीआय, इनकम टॅसचे डाग धुवून मिळतील भाजपा वॉशिंग मशीन‘ ‘भारत मे पाप धोने के दो तरीके हैं… १) गंगा में स्नान २) BJP में छलांग…‘ ‘ मोदी वॉशिंग पावडर‘ अशा अनेक अभिनव घोषणांचे फलक हाती घेऊन कार्यकर्ते जोरदार घोषणा देत होते.

याप्रसंगी प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी भाजपवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, देशातील महागाई, बेकारी आणि भ्रष्टाचार यामुळे पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणूकांमध्ये भाजपला बहुमत मिळणार नाही व मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाही. हे लक्षात आल्यामुळेच इडी, सीबीआय आदिंचा वापर करुन भाजप छोटे पक्ष फोडत आहे आणि भ्रष्टाचाराचे आरोप असणार्‍यांना भाजपमध्ये घेत आहे. ही जनतेची आणि लोकशाहीची क्रुर थट्टा आहे. महाराष्ट्रात भाजपने केलेला फोडाफोडीचा तमाशा जनता बघत असून येणार्‍या प्रत्येक निवडणुकीत जनता भाजपला पराभूत करेल असे ते म्हणाले.

या आंदोलनात कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता. त्यामध्ये अविनाश बागवे, लता राजगुरू, वैशाली मराठे, सुजाता शेट्टी, रफिक शेख,
रमेश अय्यर, शाणी नौशाद, रजनी ताई त्रिभुवन, राजेंद्र शिरसाठ, सुनील मलके, अनिल सोंडकर, नुरुद्दीन सोमजी, मंजूर शेख, प्रशांत सुरसे,
भूषण रानबरे, अजय पाटील, चैतन्य पुरंदरे, भरत सुराणा, मारुती माने, प्रवीण करपे, रमेश सकट, शोएब इनामदार, सुनील घाडगे,
प्रदीप परदेशी, अजित जाधव, चेतन अग्रवाल, प्रथमेश आबनावे, रोहन सुरवसे, ओंकार मोरे, विशाल मलके, आशिष व्यवहारे, सुरेश कांबळे,
गौरव बोराडे, नीलेश बोराटे, शाबीरखान आयुब पठाण, किशोर मारणे, संकेत गलांडे, साजिद शेख, प्रा. वाल्मिकी जगताप, सोमेश्वर बालगुडे,
स्वाती शिंदे, प्रियंका रणपिसे, अंजली सोलापुरे,

सुविधा त्रिभुवन, डॉ. गिरीजा शिंदे, सोनिया ओव्हाळ, आस्मा शेख, संगीता थोरात, ज्योती परदेशी, रेश्मा शिलेगावकर, कांता डोने,
कविता गायकवाड, पपीता सोनवणे, मंदाकिनी नलावडे, शिवाजी सोनार, शिवाजी भोईटे, जीवन चाकणकर, विनोद रणपिसे, अनिल पवार,
राजू शेख, विजय वारभुवन, ऋषिकेश बालगुडे, राजू नाणेकर, परवेज तांबोळी, गणेश भंडारी, जयकुमार ठोंबरे, निलेश मोटा, दीपक ओव्हळ,
अॅनड. राजेंद्र काळबेर, फैय्याज शेख, असलम बागवान, नूर शेख, गणेश काकडे, रमेश राऊत, राजेश जाधव, डॉ. साठे, प्रसन्न मोरे,
अनुप बेगी, अक्षय सोनवणे, गणेश साळुंखे, राजू देवकर, मंगेश थोरवे, गोरख पळसकर, साहिल राऊत, बंडू शेंडगे, विनायक तामकर,
नरेश नलावडे, धनंजय भिलारे, अविनाश अडसूळ, सचिन बहिरट, बाबासाहेब गुंजाळ, निलेश धुमाळ, उमेश काची, सागर कांबळे,
नितीन जैन, रफिक आलमेल, रनजीत गायकवाड, सुरेश नांगरे, सादिक लुकडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.

Web Title : Pune Congress Protest Against BJP Govt Strong agitation of Congress against the corrupt administration of BJP! ‘BJP’ washing machine, ‘Modi’ washing powder

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rupali Chakankar On Sadabhau Khot | शरद पवारांना ‘सैतान’ म्हणणाऱ्या सदाभाऊंना रुपाली चाकणकरांनी सुनावले खडेबोल, म्हणाल्या – ‘आपला आवाका आणि कुवत बघून बोला’

Uddhav Thackeray On Eknath Shinde | ‘मला हलताही येत नव्हतं हे खरं, पण तेव्हा…’, एकनाथ शिंदेंच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर (व्हिडिओ)

Pune Police Crime Branch News | गुन्हे शाखेकडून बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगणार्‍याला बुधवार पेठेतून अटक; अग्नीशस्त्र जप्त

Maharashtra Rain Update | राज्यभर 12 ते 14 जुलैदरम्यान हलक्या सरींची शक्यता; IMD