Pune Congress | PM नरेंद्र मोदी यांनी मुलींबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल पुणे शहर महिला काँग्रेसतर्फे निषेध (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Congress | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्यांच्या भाषणामध्ये बेटी बचाओ..,बेटी पटाओ.., असे शब्द वापरले. पंतप्रधानांच्या अशा वक्तव्यामुळे देशातील सर्व महिला व मुलींचा अपमान झाला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा पुणे शहर महिला काँग्रेस तर्फे पुण्यातील बालगंधर्व चौकातील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकामध्ये निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. (Pune Congress)

 

पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पुजा आनंद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या निषेध आंदोलनामध्ये पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे, अभय छाजेड, माजी आमदार दिप्ती चवधरी, अरविंद शिंदे, संगीता तिवारी, यांच्यासह शहर महिला पदाधिकारी आणि असंख्य महिला कार्यकर्ते उपस्थित होते.

 

पंतप्रधान मोदी यांनी महिलांचा जो अपमान केला आहे तो निंदनीय आहे. मुलींना पटवा हे पंतप्रधान भाजपच्या कार्यकर्त्यांना शिकवत आहेत का ? जेव्हा जेव्हा या देशात महिलांचा अपमान झाला आहे, तेव्हा हे भाजपवाले गप्प बसतात किंवा ते सबुत मिटवण्याचा प्रयत्न करतात. देशपातळीवर काँग्रेस लडकी हू.. लढ सकती हू ही घोषणा देत असल्याची आठवण यावेळी शहराध्यक्षा पुदा आनंद यांनी करून दिली. (Pune Congress)

 

 

मोदींच्या वक्तव्यामुळे समस्त स्त्रीयांचा अपमान झाला आहे. त्यांनी देशातील सर्व महिलांची माफी मागावी अशी मागणी माजी आमदार दिप्ती चवधरी यांनी केली.

 

आमच्या मुली या पटवण्यासाठी आहेत का असा प्रश्न उपस्थित उपस्थित करत,
मोदी भाषण करताना कोणत्या धुंदीत असतात हेच कळत नाही,
महिलांबद्दल किंवा मुलांबद्दल त्यांच्या मनात जे आहे ते त्यांच्या भाषणातुन समोर आले असे संगीता तिवारी यांनी सांगितले.

 

रमेश बागवे, अभय छाजेड, अरविंद शिंदे यांनी सुद्धा मोदींच्या वक्तव्याचा निषेध करत, मोदींना पुण्यात येऊ देणार नाही.
त्यांनी पुण्यात येऊन दाखवावे. पंजाबमध्ये शेतकरी आंदोलकांसमोरून त्यांना पळावे लागले.
पुण्यातुन काँग्रेसच्या महिलांच्या आंदोलनामुळे त्यांना विमानतळावरूनच परत पाठवले जाईल असा निर्धार व्यक्त केला.

 

Web Title :- Pune Congress | Pune City Women’s Congress protests against PM Narendra Modi’s use of abusive language against girls

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा