Pune Congress | जनतेत व पक्षाच्या आंदोलनात न दिसणारे झाले पदाधिकारी ! निवडीवरून शहर कॉंग्रेसमध्ये नाराजीचा सूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीमध्ये पुणे शहरातून (Pune Congress) नियुक्त केलेल्या पदाधिकार्‍यांच्या निवडीवरून धुसफूस सुरू झाली आहे. जनतेशी कुठल्याही प्रकारचा संबध नसलेल्यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान दिल्याने सर्वसामान्य कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये (Pune Congress) नाराजीनाट्य सुरू झाले आहे.

राज्याच्या कॉंग्रेस प्रदेशअध्यक्षपदी नाना पटोले (maharashtra congress president nana patole) यांची निवड झाल्यानंतर राज्य कार्यकारिणीची निवड बराचकाळ प्रलंबित होती. अखेर काल उशिरा अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीने उपाध्यक्ष, खजिनदार, सरचिटणीस, चीटणीस, कार्यकारी समिती, अनुपालन समिती सदस्यांची जंबो कार्यकारिणी घोषित केली. तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या (Pune Corporation Election) पार्श्‍वभूमीवर विद्यमान शहर अध्यक्ष रमेश बागवे (city congress president ramesh bagwe) यांचीच फेरनियुक्ती केली आहे.

सरचिटणीस पदी अभय छाजेड (Abhay Chhajed) आणि अजित आपटे (Ajit Apte), रोहीत टिळक (Rohit Tilak), विरेंद्र किराड (Virendra Kirad) यांची चिटणीसपदी माजी आमदार दिप्ती चवधरी (Former MLAs Dipti Chavdhari), डॉ. हाजी जाकीर शेख (Dr. Haji Zakir Sheikh) , प्रवक्तेपदी अनंत गाडगीळ (Anant Gadgil as Spokesperson), कार्यकारी समिती तसेच अनुपालन समितीमध्ये उल्हास पवार (Ulhas Pawar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

दरम्यान, मागील कार्यकारिणीच्या तुलनेत अनेकांना डच्चू देण्यात आला आहे.
मात्र, रमेश बागवे यांची नियुक्ती झाल्यानंतर शहर अध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावलेल्या काही मंडळींचा बागवे यांचीच फेरनिवड झाल्याने हिरमोड झाला आहे.
यासोबतच पुण्यातून जेमतेम निवड झालेल्यांमध्ये जनतेशी काही संबध नसलेल्यांचा तसेच पक्षाच्या
कार्यक्रमांमध्ये अथवा आंदोलनांमध्ये कधीही सहभागी न झालेल्या मंडळींचा समावेश करण्यात आल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
कोरोना असो अथवा पूर परिस्थितीमध्येही पक्षाच्या झेंड्याखाली काम करणारे,
पक्षाच्या माध्यमातून विविध आंदोलनात अग्रभागी असलेल्या अनेक बिनीच्या जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांना
डावलण्यात आल्याने शहर कॉंग्रेसमध्ये मोठ्याप्रमाणावर नाराजी असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.

Web Title : Pune Congress | The office bearers became invisible to the people and the party movement! Dissatisfaction with the election in the city congress

 

Nitin Landge Bribe Case | अ‍ॅन्टी करप्शन विभागानं न्यायालयात दिली माहिती, म्हणाले – ‘ते सोळा जण म्हणजेच स्थायी समितीचे 16 सदस्य’ ! त्यांच्याकडे चौकशी करणे बाकी असून…

Smartphone वापरताना करू नका ‘या’ 10 चूका, अन्यथा फोनचा बॉम्बसारखा होऊ शकतो स्फोट; जाणून घेऊन करा बचाव

Pune Crime | पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून मध्यरात्री जुगार अड्डयावर छापा ! 27 जणांवर कारवाई तर हुक्क्यासह 12.5 लाखाचा मुद्देमाल जप्त