Pune Congress | हात गाडीवर पेट्रोल डिझेलचे बॅरल ठेवून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे अनोखे आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Congress | गेल्या सहा महिन्यात झालेल्या इंधन वाढीच्या (Fuel Increase) निषेधार्थ हात गाडीवर पेट्रोल डिझेलचे बॅरेल ठेवून पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने (Pune Congress) हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या (Hindustan Petroleum Corporation) पुण्यातील मुख्य कार्यालयावर अनोखा मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) व रमेश बागवे (Ramesh Bagwe) यांच्या नेतृत्वाखाली याठिकाणी आंदोलन करुन इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला.

यावेळी केंद्र सरकारच्या (Central Government) विरुद्ध घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की, सहा महिन्यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव 129 डॉलर प्रति बॅरल होते. त्यावेळी पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Rate) प्रति लिटर शंभर रुपयांपेक्षा अधिक होते. आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (International Market) कच्च्या तेलाचे दर प्रति बॅलर 76 डॉलर ते 80 डॉलरच्या दरम्यान आहे. असे असताना सुद्धा आज पेट्रोलचा भाव 106 रुपये तर डिझेलचा भाव 94 रुपये प्रतिलिटर आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. केंद्र सरकारने जनतेच्या हिताकरिता त्वरित पेट्रोल आणि डिझेलचे दर 70 रुपये प्रति लिटर करावे, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण शहरभर तीव्र आंदोलन करण्यात येईल.

माजी गृराज्यमंत्री व प्रदेश काँग्रेस कमिटीचे (Pune Congress) उपाध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की,
इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आहे. सर्व तेल कंपन्यांकडे तेलाचा साठा मोठ्या प्रमाणात आहे.
रशियाने भारताला कच्च्या तेलाचा साठा पुरवला आहे.
कच्च्या तेलाचा साठा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे भारत इंधन फ्रान्स, हॉलंड व अनेक देशांना निर्यात करीत आहे.
एकीकडे इंधन निर्यात करून तेल कंपनी व सरकार मोठ्या प्रमाणावर नफा मिळवत आहे आणि दुसरीकडे
कच्च्या तेलाचे भाव कमी असताना सुद्धा ग्राहकांना जास्तीच्या दराने इंधन देत आहे हे अन्याकारक आहे.
काँग्रेसपक्ष नेहमी जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन करत असते जर केंद्र सरकारने इंधन चे दर कमी
केले नाही तर काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बागवे यांनी दिला.

काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशनचे मुख्य व्यवस्थापक मनीष अग्रवाल
(Chief Manager Manish Aggarwal) यांना भेटून निवेदन दिले. यावेळी नगरसेवक रवींद्र धंगेकर,
अविनाश बागवे, नरुद्दीन सोमजी, रमेश अय्यर, प्रशांत सुरसे, शेखर कपोते, शाबिर खान, चेतन आगरवाल,
मंजूर शेख, शिलार रतनगिरी, स्वाती शिंदे, कान्होजी जेधे, बबलू कोळी, सुनील घाडगे, प्रदीप परदेशी, दया आडगळे,
रोहित अवचिते, अंजली सोलापुरे, दिलीप थोरात, संगीता थोरात, रॉबर्ट डेव्हिड, क्लेमेंट, लाजरस, सुनील बावकर,
हुसेन शेख, अस्लम बागवान, रामदास मारणे, सुरेश कांबळे, फैयाज शेख, विपुल उमंदे, सोनिया ओव्हाळ,
सनी ओव्हाळ, मंगला चव्हाण व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title :- Pune Congress | Unique movement of Congress to protest fuel price hike by placing barrels of petrol diesel on hand carts

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Winter Session -2022 | ‘कोयता गँग’मधला अल्पवयीन मुलांचा समावेश गंभीर मुद्दा, पुणे शहर व परिसरातील ‘कोयता गँग’च्या गुंडांची दहशत रोखा; अजित पवारांची सभागृहात मागणी

Gram Panchayat Election Result 2022 | निवडणूक निकालानंतर झालेल्या दगडफेकीत भाजप कार्यकर्त्याचा मृत्यु; जळगाव येथील घटना…

Ajit Pawar | अधिवेशनात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी