पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – मुलगा होत नसल्यावरुन सासरच्याकडून होणाऱ्या शारिरीक व मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा प्रकार सिंहगड रोड परिसरात घडला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लता मंगेश झांबरे (वय २९) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती मंगेश बिभीषण झांबरे, दीर श्रीकांत झांबरे, जावू अर्चना झांबरे (सर्व रा. नर्हे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सचिन पंडीत (वय २६, रा.नेकनू, बीड) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लता आणि मंगेश यांचे काही वर्षांपुर्वी लग्न झाले होते. त्यानंतर मुलगा होत नसल्यानेे पती मंगेश, दीर श्रीकांत व जाऊ अर्चना ही लताला मानसिक त्रास देत होत्या. सततच्या होणाऱ्या शिवीगाळ व शारीरिक त्रासाला कंटाळून लता यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अधिक तपास सिंहगड पोलिस करीत आहेत.