Pune : गुजरात भवनेचे भूमिपूजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –    समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पुना गुजराती बंधू समाजाच्या वतीने कोंढवा येथे खरेदी करण्यात आलेल्या सहा एकर जागेपैकी केळवणी मंडळाच्या २ एकरमध्ये सीबीएससी इंटरनॅशनल स्कूलचे बांधकाम सुरू होऊन दोन वर्षांमध्ये ८०% बांधकाम बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित चार एकरमध्ये गुजराथ भवन आणि गुजराथ क्लब बांधण्याचा निर्णय समाजाने घेतला आहे. पुना गुजराती बंधू समाजाचा भूमिपूजन सोहळा पार पडला असल्याची माहिती संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त राजेश शहा यांनी दिली.

गुजरात भवनचे भूमिपूजन आज संस्थेचे अध्यक्ष नितीन भाई देसाई आणि राजेश भाई शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. भूमिपूजन प्रसंगी बांधकाम कमिटीचे अध्यक्ष अश्विन अजमेरा, उपाध्यक्ष भरत शहा, सहव्यवस्थापकीय विश्वस्त नैनेश नंदू आणि संस्थेचे इतर पदाधिकारी, विश्वस्त आदी मान्यवर उपस्थित होते.

शहा म्हणाले, गुजराती समाजाची सर्वात जुनी संस्था असलेली पुना गुजराती बंधू समाजाची स्थापना १९१३ साली झाली. त्यामुळे या ठिकाणी शाळेच्या बांधकामास सुरुवात झाली असून गुजराथ भवन आणि क्लब यांचे काम प्रगतीपथावर आहे. गुजरात भवनमध्ये साधारण दहा हजार स्क्वेअर फूट वातानुकूलित दोन भव्य हॉल बांधण्यात येणार आहे. तर ४० लोकांना राहण्यासाठी वातानुकूलित खोली, मोठे रसोई घर, तळमजल्यावर २ मजली चारचाकी पार्किंग, दुचाकी पार्किंग या सुखसोयी असलेले दोन लाख फुटाचे गुजराथ भवन बांधण्याचा संकल्प समाजाने केला आहे.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधारण सात आठ वर्षांपूर्वी पुणे येथे येऊन या जागेवर गुजरात भवन आणि शाळा बांधण्यात याव्या याबाबत मार्गदर्शन केले होते. त्यानुसार या दिशादर्शक प्रकल्पास सुरुवात करण्यात आली असून कोविड परिस्थितीमुळे अल्प मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेच्या पदाधिकारी आणि विश्वस्तांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले असल्याची माहिती शहा यांनी दिली.