Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 107 रुग्णांना डिस्चार्ज; जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहरामध्ये गुरुवारी (दि.7) 129 कोरोनाबाधित (Pune Corona) आढळून आले आहेत. तर 107 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. आज विविध तपासणी केंद्रावर 7 हजार 562 संशयितांची तपासणी करण्यात आली असून, यामध्ये 129 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (positive Report) आला आहे. शहरात कोरोना बाधित (Pune Corona) रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या वाढली आहे.

पुणे शहरातील (Pune City) सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 583 इतकी झाली आहे. आज दिवसभरात 08 जणांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये 03 रुग्ण पुण्याबाहेरील आहे. तर 05 रुग्ण शहरातील आहेत.
आजपर्यंत शहरामध्ये 9 हजार 046 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या
(Pune Municipal Corporation) आरोग्य विभागाने (Health Department) दिली आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्ण संख्या 184 इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची (Pune Corona) संख्या 229 इतकी आहे.
शहरात आत्तापर्यंत 34 लाख 17 हजार 003 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.
यापैकी 5 लाख 02 हजार 101 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी 4 लाख 91 हजार 472 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

Web Title : Pune Corona | 107 Corona patients discharged in Pune in last 24 hours; Learn other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Earn Money | 25 हजार गुंतवून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहा होईल 3 लाख रुपयांची कमाई; सरकार देईल 50% मदत

Chitra Wagh Promoted | भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषीत, चित्रा वाघ यांना बढती

Mira-Bhayandar Firing Case | कनिष्ठ अभियंत्यांनी दिली वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी, धक्कादायक कारण आलं समोर