Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 120 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये (Pune Corona) कोरोनाबाधित रुग्णांच्या (Corona Infected Patients) संख्येत वाढ होत आहे. मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover Patient) प्रमाण कमी होत आहे. आज पुण्यातील कोरोना बाधित (Pune Corona) रुग्णांची संख्या शंभरच्या वर आहे. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 120 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 72 रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 08 हजार 744 इतके कोरोना बाधित (Pune Corona) रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 98 हजार 690 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 02 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एक रुग्ण पुण्यातील आहेत तर एक रुग्ण पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील आहेत. आतापर्यंत पुणे शहरात 9112 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Pune Corona)

आज दिवसभरात शहरातील खासगी आणि शासकीय स्वॅब तपासणी केंद्रावर 7429 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत पुण्यामध्ये 38 लाख 22 हजार 476 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत.
शहरामध्ये सध्या 942 रुग्ण अॅक्टिव्ह (Active Patient) आहेत. त्यापैकी 77 रुग्ण गंभीर आहेत.
तर 59 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (PMC Health Department) दिली आहे.

 

Web Title :- Pune Corona | 120 new corona patients in Pune in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | प्रवाशांचे मोबाईल आणि दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या बंडगार्डन पोलिसांनी आवळल्या मुसक्या, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त (व्हिडीओ)

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील मिळकतींची करपात्र रक्कम निश्‍चित करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

MahaTET Exam Scam Case | टीईटी पेपरफुटी प्रकरण ! प्रीतीश देशमुखचा वर्ध्यात राजवाडा, कोट्यवधींची जमवली माया

 

Pune Crime | लाईट तोडल्याच्या रागातून ग्राहकाचा दापोडीमधील महावितरण कार्यालयात राडा, भोसरी पोलीस ठाण्यात FIR दाखल