Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 128 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दीडशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या अडीच हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 128 नवीन रुग्णांची नोंद (Pune Corona ) झाली आहे. तर 171 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 95 हजार 343 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे.
त्यापैकी 4 लाख 84 हजार 187 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 12 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 8922 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 2234 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये सध्या 2234 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 198 रुग्ण गंभीर आहेत.
तर 281 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6802 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 31 लाख 25 हजार 471 तपासणी करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
(Health Department of Pune Municipal Corporation)

 

Web Title : Pune Corona | 128 new patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | 6 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ! पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरुद्ध लोकायुक्तांकडे तक्रार दाखल

Pune Crime | वर्षभरापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक; गुन्हे शाखेकडून पिस्तुलासह काडतुस जप्त

Beed Crime | आलिशान कारने घेतला युवकाचा जीव; बीडच्या बड्या नेत्याच्या मुलाचं नाव समोर