पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corona | शहरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र, नागरिकांनी अद्यापही खबरदारी घेणे गरजेचे आहे. गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनाचे 159 नवे रूग्ण (Pune Corona) आढळून आले आहेत तर दिवसभरात कोरोनाचे 130 रूग्ण बरे झाले आहे. त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळं 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी पुण्याबाहेरील दोघांचा समावेश आहे.
पुण्यातील एकुण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता 4 लाख 99 हजार 618 वर जाऊन पोहचली आहे. त्यामध्ये समाधानाची बाब म्हणजे आता पर्यंत कोरोनाचे 4 लाख 89 हजार 14 रूग्ण बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 1 हजार 596 रूग्ण सक्रिय आहेत. एकुण अॅक्टीव्ह रूग्णांपैकी 180 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आतपपर्यंत कोरोनामुळं पुणे शहरात 9008 रूग्णांचा मृत्यू झला आहे. गेल्या 24 तासात 6 हजार 187 रूग्णांची तपासणी करून त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी 159 रूग्णांचा कोरोनाचा अहवाल हा सकारात्मक आला आहे.
Web Titel :- Pune Corona | 130 ‘corona’ free in Pune in last 24 hours, find out other statistics
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold Price Today | सोन्याच्या दरात किंचित घट तर चांदी वधारली, जाणून घ्या आजचे दर
Maharashtra Rains | राज्यात ‘धो-धो’ पाऊस ! मुंबई-पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘अलर्ट’