Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 132 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात कोरोना बाधित रुग्णांच्या (Pune Corona) संख्येत मागील तीन चार दिवसांपासून वाढ पहायला मिळत आहे. आज (रविवार) दुपारी चार वाजेपर्यंत शहरामध्ये कोरोनाचे (Pune Corona) 132 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 121 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (PMC Health Department) दिली आहे.

 

रविवारी पुणे शहरात 6 हजार 075 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये 132 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज पर्यंत करण्यात आलेल्या एकूण 38 लाख 36 हजार 057 प्रयोगशाळा तपासणीत 5 लाख 09 हजार 025 जणांना कोरोनाची बाधा (Pune Corona) झाली आहे. यापैकी 4 लाख 98 हजार 930 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

 

शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या (Pune Corona) वाढत असताना शहरात मृत्यूचे प्रमाण (Fatality Rate) कमी होत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. रविवारी शहरातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरात 9 हजार 114 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या शहरामध्ये 981 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून यामध्ये 76 रुग्ण गंभीर आहेत. तर 56 रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Pune Corona | 132 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्याच्या कर्वेनगर परिसरात भरदिवसा 20 वर्षीय युवकाचा तलवारीने सपासप वार करून खून; प्रचंड खळबळ

Gold Price Today | सोन्याच्या किमतीत घसरणीने खरेदीदारांच्या चेहर्‍यांवर समाधान, जाणून घ्या आठवडाभरातील सोने-चांदीची स्थिती

Pune Crime | ‘पुणे ग्रामीण’ची मोठी कारवाई ! यवत पोलिसांकडून पाटस परिसरातून 50 लाखाचा गांजा जप्त; 7 पुरुष आणि 5 महिलांना अटक

 

GST | सोसायटीमध्ये राहत असाल तर मेंबर-फीमध्ये 2017 पासूनचा ‘जीएसटी’ द्यावा लागेल, 1 जानेवारीपासून नियम आणतंय सरकार, जाणून घ्या