Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 134 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन कोरोना (Pune Corona) रुग्णांची संख्या दीडशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या दीड हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 134 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 211 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 385 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 89 हजार 892 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 07 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 02 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 05 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9020 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 1473 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
पुणे शहरामध्ये सध्या 1473 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 182 रुग्ण गंभीर आहेत.
तर 231 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 8694 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 33 लाख 39 हजार 732 तपासणी करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

Web Title :-  Pune Corona | 134 new patients of ‘Corona’ in Pune city in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray | संजय राऊतांचे ‘ते’ विधान अन् उद्धव ठाकरेंचे अमित शहांसोबत ‘लंच”, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Home Remedies of Cavity Pain | ‘कॅव्हिटी’च्या दुखण्यापासून पाहिजे असेल सुटका तर अवलंबा ‘हे’ 7 घरगुती उपाय, मिळेल आराम

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,292 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी