Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 138 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये शुक्रवारी (दि.1) 155 कोरोनाबाधित (Pune Corona) आढळून आले आहेत. तर 138 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. आज विविध तपासणी केंद्रावर 8 हजार 419 संशयितांची तपासणी करण्यात आली असून, यामध्ये 155 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (positive Report) आला आहे. शहरात कोरोना बाधित (Pune Corona) रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरातील अॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या वाढली आहे.

पुणे शहरातील (Pune City) सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 502 इतकी झाली आहे. आज दिवसभरात 04 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 2 रुग्ण पुण्याबाहेरील आहे. तर 2 रुग्ण शहरातील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये 9 हजार 031 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) आरोग्य विभागाने (Health Department) दिली आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्ण संख्या 185 इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 222 इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत 33 लाख 76 हजार 067 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 5 लाख 01 हजार 181 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी 4 लाख 90 हजार 648 जण कोरोनामुक्त (Pune Corona) झाले आहेत.

Web Title :- Pune Corona | 138 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lahu Balwadkar | लहू बालवडकर हेच सर्वसामान्य जनतेचे खरे हिरो – प्रवीण दरेकर

Sukanya Samriddhi Yojana | सुकन्या समृद्धी योजनेवर मिळत राहील सर्वात जास्त व्याज, जाणून घ्या काय आहेत इतर फायदे

Pune Crime | कॉलेजच्या फी भरण्यावरुन वादात विद्यार्थ्याने दरवाजाच्या काचेवर डोके आपटून केले स्वत:ला जखमी