Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 150 नवीन रुग्ण, 249 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन  – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Corona in Pune city) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची (Pune Corona) संख्या दोनशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या तीन हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून शहरामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या अधिक होती. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये (Pune city) 150 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 249 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. pune corona | 150 new corona patients in Pune city in last 24 hours

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 79 हजार 882 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 68 हजार 586 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 10 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8617 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 2679 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये सध्या 2679 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 290 रुग्ण गंभीर आहेत. तर 448 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 4084 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 26 लाख 97 हजार 692 तपासणी करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

Web Title : pune corona | 150 new corona patients in Pune city in last 24 hours

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime News | पुण्यातील प्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षकांना ऑनलाइन क्लास सुरू असताना शिवीगाळ; कोंढवा पोलीस ठाण्यात

Burglary in Pune | पुण्याच्या कात्रज परिसरात घरफोडी, साडे चार लाखाचा ऐवज लंपास

Pune Crime News | लोहगाव परिसरात झोमॅटो डिलिव्हरी बॉयला अडवून चाकूने सपासप वार, प्रचंड खळबळ

Pregnant Women Problems | गरोदरपणात रक्ताच्या उलट्या का होतात? कारणे आणि घरगुती उपचार जाणून घ्या