Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 151 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन कोरोना ((Pune Corona) रुग्णांची संख्या दीनशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या पुन्हा दीड हजाराच्या वर गेल्याने काहींसी चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 151 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 169 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 01 हजार 503 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 90 हजार 948 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे (Pune Corona) 06 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 03 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 03 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9036 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 1519 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
पुणे शहरामध्ये सध्या 1519 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 214 रुग्ण गंभीर आहेत.
तर 188 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6564 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 33 लाख 90 हजार 305 तपासणी करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

Web Title :- Pune Corona | 151 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Auto Debit Transaction | जर ऑटो-डेबिटने भरत असाल वीज, पाणी आणि LPG चे बिल तर RBI चा ‘हा’ नियम परिणाम करू शकतो, जाणून घ्या कसा

Pune Anti Corruption | 10 हजाराची लाच घेताना पुणे मनपातील 2 कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात