
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 160 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. शुक्रवारी (दि.15) सायंकाळी चार वाजेपर्यंत शहरात 87 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत पुणे शहरात 5 लाख 2 हजार 985 पुणेकरांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 4 लाख 92 हजार 750 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. पुणे शहरात (Pune Corona) दैनंदिन रुग्णांच्या (New patient) संख्येत घट झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
पुणे कोरोना अपडेट : शुक्रवार दि. १५ ऑक्टोबर, २०२१
◆ उपचार सुरु : १,१७५
◆ नवे रुग्ण : ८७ (५,०२,९८५)
◆ डिस्चार्ज : १६० (४,९२,७५०)
◆ चाचण्या : ६,८६८ (३४,६९,५४८)
◆ मृत्यू : १ (९,०६०)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/4JZcrqfBXv— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 15, 2021
पुणे शहरामध्ये आजपर्यंत 34 लाख 69 हजार 548 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 5 लाख 2 हजार 985 जण कोरोना बाधित
(Corona infected patients) आढळून आले आहे. यापैकी 9060 जणांचा मृत्यू झाला असला तरी, यातील बहुतांश रुग्ण (Pune Corona) हे इतर आजारांनी ग्रस्त होते.
आजपर्यंत 4 लाख 92 हजार 750 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
सध्या शहरामध्ये सक्रिय (Active patient) रुग्णसंख्या 1 हजार 175 इतकी आहे.
पुणे महापालिकेच्या (PMC) आरोग्य विभागाने (Health Department of Pune Municipal Corporation) दिलेल्या माहितीनुसार,
शुक्रवारी (दि.15) 87 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
आज विविध तपासणी केंद्रावर 6 हजार 868 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. आज दिवसभरात 02 जणांचा मृत्यू झाला आहे.
यापैकी 1 पुणे शहरातील आहेत तर 1 जण पुण्याबाहेरील आहेत.
शहरामध्ये 177 गंभीर रुग्ण असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 225 इतकी आहे.
Web Title : Pune Corona | 160 patients discharged from Corona in Pune city in last 24 hours, find out other statistics
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Dhananjay Munde | ‘गावागावात संविधान भवन बांधणार’ – धनंजय मुंडे