Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 167 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज (सोमवार) पुणे शहरातील नवीन कोरोना (Pune Corona) रुग्णांची संख्या शंभरच्या आसपास आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या दीड हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 167 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 167 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 494 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona) आढळून आले आहे.
त्यापैकी 4 लाख 90 हजार 059 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 05 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 02 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 03 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 9022 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 1413 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये सध्या 1413 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 182 रुग्ण गंभीर आहेत. तर 227 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 5937 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 33 लाख 46 हजार 669 तपासणी करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

 

Web Title : Pune Corona | 167 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Taljai Development Project | तळजाई विकास प्रकल्पाला केला जाणारा विरोध हा दुर्दैवी ! प्रोजेक्ट आर्किटेक्ट आनंद उपळेकर यांचे मत

kirit somaiya | मी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनाच नोटीस दिलीय, हिम्मत असेल तर रोखून दाखवा – सोमय्या

Harmful Effects of Nail Polish | जीवघेणे ठरू शकते नेलपेंट लावणे, जाणून घ्या यामुळे होणारे गंभीर नुकसान